म्युकरमायकोसिसवर वेळीच उपचार आवश्यक - डॉ. पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:15 AM2021-05-19T04:15:18+5:302021-05-19T04:15:18+5:30
पत्रकात म्हटले की, पुणे, मुंबईमधील विविध रुग्णालये, डेंटल क्लिनिकमध्ये कोरोनानंतर या आजाराचे अनेक रुग्ण आढळले आहेत. बुरशीची ...
पत्रकात म्हटले की, पुणे, मुंबईमधील विविध रुग्णालये, डेंटल क्लिनिकमध्ये कोरोनानंतर या आजाराचे अनेक रुग्ण आढळले आहेत. बुरशीची माहिती नसल्याने संसर्ग वाढत आहे, वेळीच निदान, उपचार होत नसल्याने दात, वरचा जबडा, डोळे, दृष्टी, तर काही रुग्णांना प्राण गमवावे लागत आहेत. कर्करोगाच्या वाढीपेक्षा हा संसर्ग वाढण्याचा वेग दहापट आहे. कोरोना रुग्णांना म्युकरमायकोसिसपासून वाचविण्यासाठी दक्ष रहाणे आवश्यक असून, फिजिशियन, कोरोना उपचार केंद्रे, डेंटल क्लिनिक, ओरल मॅक्सिलोफेशियल सर्जन ( मुखशल्य चिकित्सक ) नाक - कान- घसा तज्ज्ञ न्यूरो सर्जन, डेंटल सर्जन या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. वेळेवर निदान, शास्त्रशुद्ध उपचार, पुनर्वसन तिन्ही टप्प्यात या सर्व डॉक्टरांचे मोगदान महत्त्वाचे असल्याचेही पाटील यांनी म्हटले आहे.