‘टायर प्लॅन्ट’ मोजतोय घटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 11:49 PM2019-09-24T23:49:53+5:302019-09-25T00:41:37+5:30
राज्य परिवहन महामंडळाचे टायर प्लॅन्ट अखेरची घटका मोजत असून, चोवीस तास चालणारे हे प्रकल्प आता अवघ्या एका शिफ्टवर येऊन ठेपले आहेत.
नाशिक : राज्य परिवहन महामंडळाचे टायर प्लॅन्ट अखेरची घटका मोजत असून, चोवीस तास चालणारे हे प्रकल्प आता अवघ्या एका शिफ्टवर येऊन ठेपले आहेत. त्यातही कमी मनुष्यबळामुळे कर्मचाऱ्यांवर ताण येत असल्याने महामंडळाला सदर प्रकल्प चालवायचा आहे की बंद करायचा, असा प्रश्न कर्मचाऱ्यांकडून विचारला जात आहे.
राज्य परिवहन महामंडळाचे राज्यात विविध ठिकाणी नऊ प्रकल्प असून, नाशिकमध्येदेखील टायर नूतनीकरणाचा प्रकल्प आहे.
या प्रकल्पाची अवस्थादेखील यापेक्षा वेगळी नाही. पूर्वी चोवीस तास चालणाºया या प्रकल्पात जवळपास ९५ कर्मचारी कार्यरत होते. तीनही सत्रामध्ये चोवीस तास प्रकल्प चालविला जात होता. परंतु महामंडळाच्या खासगीकरण धोरणामुळे कर्मचाºयांची संख्या कमी करण्यात आली आणि प्रकल्पाकडे दुर्लक्ष केल्यामुळे अधिकच अवकळा आली. त्यामुळे तीन शिफ्ट चालणार हा प्रकल्प काही दिवस दोन शिफ्टमध्ये आणि आता तर एकच शिफ्टमध्ये अवघ्या दहा कर्मचाºयांवर सुरू आहे. या कर्मचाºयांना दैनंदिन प्रॉड््क्शन नियमानुसार ३५ ते ४० टायर्सचे नूतनीकरण करून द्यावेच लागते. त्याचा ताण या कर्मचाºयांवर येत असल्याच्या तक्रारी आहेत.
राज्य परिवहन महामंडळात अनेक बदल होत असताना काही बदलांचे निश्चित स्वागत करण्यात आले, मात्र खासगीकरणाच्या निर्णयामुळे अनेक कर्मचाºयांना मूळ अस्थापना सोडून अन्यत्र कामे करावी लागत आहेत. अगदी स्वच्छतेपासून ते तांत्रिक कर्मचाºयांच्या कामांमध्येही बदल करण्यात आला. एवढे करूनही महामंडळाला नेमका काय लाभ झाला याचा कोणताही हिशेब महामंडळाने मांडलेला नाही. खासगीकरणातून अनेक कामे महामंडळात सुरू झाली असताना टायर प्लॅन्टच्या बाबतीतही असाच काहीसा निर्णय होण्याची शक्यता आहे. याचा फटका मात्र नियमित कर्मचाºयांना बसत असून, त्यांना कमी मनुष्यबळात राबवून घेतले जात आहे. या कर्मचाºयांना शाश्वत कामाची अपेक्षा असल्याने विभाग नियंत्रकांनी त्याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. महामंडळातील अनेक कामांचे खासगीकरण होत असताना टायर प्लॅन्ट तर बंद करण्याचीच चर्चा होत आहे. यामुळे कर्मचाºयांच्या कामावर गदा येणार असल्याने महामंडळाच्या मनुष्यबळात प्लॅन्ट सुरू ठेवावा, अशी मागणी आहे.
अन्य कर्मचाºयांच्या नियुक्तीची मागणी
टायर प्लॅन्टमध्ये असलेल्या किरकोळ कामांसाठी नवीन भरती झालेल्या कर्मचाºयांना संधी दिली तर प्लॅन्टमधील नियमित कर्मचाºयांना अधिक उत्पादन देणे शक्य होऊ शकते. सद्यपरिस्थितीत या कर्मचाºयांना पेस्टिंगपासून भट्टीपर्यंतची कामे करावी लागतात. या कामांचे वर्गीकरण होणे अपेक्षित आहे. यासाठी नवीन भरती झालेल्या कर्मचाºयांना टायर प्लॅन्टमध्ये ड्युटी द्यावी, असे जुन्याजाणत्या कर्मचाºयांचे म्हणणे आहे.
टायर प्लॅन्टमध्ये महिलांच्या क्षमतेनुसार अनेक कामे करण्यासारखी आहेत. शिवाय त्या कौशल्यपूर्ण कामे हाताळू शकत असल्याने त्यांना सामावून घेतले तर अन्य कर्मचाºयांवरील लहानसहान कामाचा ताण कमी होऊन ते अधिकाधिक उत्पादन देऊ शकतील, अशी निदान नाशिक शहरातून या प्रकल्पाची सुरुवात झाली. नाशिक पॅटर्न म्हणून राज्यात त्याचा उपयोग होऊ शकणार आहे.
कामही झाले कमी
महामंडळाच्या टायर प्लॅन्टमध्ये पूर्वी मोठ्या प्रमाणात काम चालत होते. परंतु आता टायर घासण्याचे प्रमाण कमी झाल्याने रिमोल्डिंगही घटले आहे. रस्त्यांची झालेली सुधारणा तसेच ट्युबलेस टायर यामुळे टायरचे आयुर्मान वाढले आहे. त्याचा परिणाम टायर नूतनीकरणावर झाल्याचे बोलले जाते.