व्यापाऱ्यांकडील थकीत पैसे द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 05:20 PM2018-09-30T17:20:36+5:302018-09-30T17:21:36+5:30
उमराणे : येथील निवृत्तीकाका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीची सहावी वार्षिक सर्वसाधारण सभा मूलभूत सुविधा, लिलावासाठी जागा, शेतकºयांचे व्यापाºयांकडील थकीत पैसे, बाजारशुल्क आदी विषयांवर चर्चा करीत पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी समितीचे सभापती राजेंद्र पुंडलिक देवरे हे होते. चर्चेत बाजार समितीत माल विक्र ीस आलेल्या शेतकºयांना सुख-सुविधा, लिलावासाठी जागा, सीसीटीव्ही कॅमेरे, प्रवेशद्वार, व्यापाºयांकडील शेतकºयांची देणी, मार्केट फी वसुली, रस्ते आदींसह विविध विषयांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. या प्रश्नांना उत्तरे देताना समितीचे सभापती राजेंद्र देवरे यांनी सांगितले की, तालुक्यात, जिल्ह्यात नव्हे संपूर्ण राज्यात उमराणे बाजार समितीचा नावलौकिक आहे. त्यामुळेच या समितीत कसमादे पट्ट्यासह धुळे, जळगाव, नंदुरबार आदी ठिकाणांहून शेतकरी बांधव आपला शेतमाल विक्र ीस आणतात. त्यांची विश्वासार्हता टिकविण्यासाठी आगामी काळात सर्व सुखसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. व्यापाºयांकडील शेतकºयांचे थकीत पैसे मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असून, मार्केट फी वसुलीबाबत योग्य ती कारवाई करण्यात येईल; परंतु बाजार समितीचा विकास होत असताना कोणीही हेतुपुरस्सर वाद घालू नये. यासाठी बाजार समितीचे मुख्य घटक असलेले शेतकरी बांधव, संचालक मंडळ, व्यापारी, खरेदीदार, माथाडी, कर्मचारी वर्ग यांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. सभेस समितीचे माजी सभापती विलास देवरे, उपसभापती महेंद्र पाटील, संचालक बाळासाहेब अहेर, प्रशांत देवरे, रामराव ठाकरे, संजय देवरे, प्रवीण बाफणा, धर्मा देवरे, नथा देवरे, सरला खैरनार, विजयाताई खैरनार, सुंदरबाई झारोळे, शोभा अहेर, मिलिंद शेवाळे, हिरामण खैरनार, संजय अहिरे, विश्वास बस्ते आदींसह उमराणे, सांगवी, कुंभार्डे, चिंचवे, गिरणारे, तिसगाव,वर्हाळे,खारीपाडा आदी गावातील ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे संचालक, शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिव नितीन जाधव यांनी केले. चौकट- नोटाबंदीच्या काळात व त्यानंतरही येथील कांदा व्यापाºयांनी शेतकºयांना मालविक्र ीचे दिलेले धनादेश वारंवार बाउन्स होणे, तसेच काही व्यापाºयांकडे बाजार समितीची देखभाल फी बाकी, परवाने रद्द, प्रशासक नेमणूक, पुन्हा संचालक मंडळ, व्यापाºयांवर गुन्हे आदी विषयांबाबत गेल्या वर्षभरात अनेक घडामोडी घडल्याने ही बाजार समिती चर्चेत राहिली आहे. त्यामुळे बाजार समितीची सर्वसाधारण सभा कशी पार पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.