कर्जाला कंटाळून युवा शेतकऱ्याने संपविले जीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:12 AM2021-07-11T04:12:08+5:302021-07-11T04:12:08+5:30
चार वर्षापूर्वी गिरणारे येथील बॅकेकडून सहा लाख रुपये शेतीसाठी बत्तासे यांनी कर्ज घेतलेले होते. परंतु चार वर्षात काबाडकष्ट उपसूनदेखील ...
चार वर्षापूर्वी गिरणारे येथील बॅकेकडून सहा लाख रुपये शेतीसाठी बत्तासे यांनी कर्ज घेतलेले होते. परंतु चार वर्षात काबाडकष्ट उपसूनदेखील शेतीतून उत्पन्न न मिळाल्यामुळे त्यांना कर्जाचा एकही हप्ता भरता आला नाही. बतासे यांनी धोंडे गाव येथे शेती घेतली होती. गिरणारे ते धोंडे गाव हा चार किलोमीटर प्रवास करून ते शेती व्यवसाय करत होते .परंतु मागील काही वर्षांपासून शेतपिकातून पाहिजे तसे उत्पन्न मिळत नसल्याने कर्जाचे हप्ते फेडणे कठीण झाले होते. त्यात घरातील वाढता खर्च कीटकनाशक औषध विक्रेत्यांची वाढती उधारी अशा कारणांमुळे विवंचनेत सापडून वैफल्यावस्थेत त्यांनी आत्महत्या केली असल्याचा दावा गावकऱ्यांकडून केला जात आहे. साहेबराव ऊर्फ उद्धव यांचे पितृछत्र लहानपणीच हरपलेले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन लहान मुली, भाऊ असा असा परिवार आहे. त्यांनी उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
100721\10nsk_43_10072021_13.jpg
साहेबराव बत्तासे