पोलीसपाटलांचे थकले मानधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 12:04 AM2020-01-05T00:04:02+5:302020-01-05T00:04:30+5:30

नांदूरवैद्य : गावोगावी शांतता सुव्यवस्थेसाठी प्रयत्नशील असणाऱ्या पोलीसपाटलांना पुरेसे मानधन मिळत नाहीच; पण जे आहे तेही वेळेवर दिले जात ...

Tired honors from the police | पोलीसपाटलांचे थकले मानधन

पोलीसपाटलांचे थकले मानधन

googlenewsNext
ठळक मुद्देनाराजी । शासनाकडून दुर्लक्ष; कुटुंबावर उपासमारीची वेळ

नांदूरवैद्य : गावोगावी शांतता सुव्यवस्थेसाठी प्रयत्नशील असणाऱ्या पोलीसपाटलांना पुरेसे मानधन मिळत नाहीच; पण जे आहे तेही वेळेवर दिले जात नाही, नवीन सरकारने तरी या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नाशिक जिल्हा गावकामगार पोलीसपाटील संघटनेने केली आहे.
पोलीस व जिल्हा प्रशासनाला गावोगावच्या शांतता व सुव्यवस्थेसाठी मदत करणारा महत्त्वाचा घटक म्हणून पोलीसपाटील यांची ओळख आहे. गाव तंटामुक्त करण्यासाठी पोलीसपाटील यांचे मोठे महत्त्व आहे. तीन वर्षांपूर्वी राज्यात जवळपास १८ हजार पोलीसपाटलांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात सुशिक्षित तरुणांना मोठ्या प्रमाणावर संधी मिळाली, तर काही ठिकाणी पदे रिक्त असल्याने इतर गावांचाही अतिरिक्त कार्यभार अनेकांवर दिलेला आहे. राज्यात बहुतांश गावे ही पोलीसपाटील यांच्या माध्यमातून तंटामुक्त झाली. काही गावांत दारूबंदी, अवैध धंदे तसेच गौणखनिज चोरीही रोखण्यात यश आले आहे, त्यांना महिन्याला मानधन मिळावे ही अपेक्षा असते मात्र ते वेळेवर कधीच मिळत नसल्याचे चित्र राज्यभरात दिसून येत आहे.
तुटपुंज्या मानधनावर गावची धुरा खांद्यावर सांभाळणाºया पोलीसपाटील यांना चार-चार महिने मानधनाची प्रतीक्षा करावी लागत आहे. एप्रिल २०१९ पासून मानधन वाढविण्यात येऊन साडेसहा हजार रुपये करण्यात आले तेव्हापासून तर कधीच वेळेवर मिळत नाही. ग्रामीण भागात काही पोलीसपाटील यांची उपजीविकाच मानधनावर चालत असल्याने त्यांचे आर्थिक गणित कोलमडून उपासमारीची वेळ आली आहे. उच्चशिक्षित पोलीसपाटील यांना अवघे ६५०० रुपये प्रतिमहिना मानधन दिले जाते, शिवाय इतर कुठलीही सुविधा अथवा सुरक्षितता पुरविली जात नाही.

पोलीसपाटील हा अत्यंत प्रामाणिक व निष्ठेने काम करतो. शासनाचे कान व डोळे म्हणून पाटलांकडे बघितले जाते, अनेक अधिकारी गावपातळीवर पोलीसपाटलावरच विसंबून काम करतात; परंतु मानधन व इतर मागण्यांबाबत बोलतही नाही. थकीत मानधनाबाबत पोलीस अधीक्षक कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांशी भेटून चौकशी केली असता शासनस्तरावरून निधी मिळाला नसल्याचे सांगण्यात आले.
- चिंतामण मोरे, जिल्हाध्यक्ष,
गाव कामगार - पोलीसपाटील संघटना.

Web Title: Tired honors from the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार