सहा महिन्यांपासून थकले पगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 10:45 PM2017-08-12T22:45:50+5:302017-08-13T01:18:56+5:30
तालुक्यातील नगरसूल विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाºयांचे गेल्या सहा महिन्यांपासून पगार नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या शिक्षकांनी थेट वेतन अधीक्षकांचे नासिक येथील कार्यालय गाठून निवेदन दिले. अधीक्षकांच्या नावे दिलेले निवेदन वेतन पथकाचे मुख्य लिपिक व्ही. डी. खोडके यांनी स्वीकारले.
येवला : तालुक्यातील नगरसूल विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाºयांचे गेल्या सहा महिन्यांपासून पगार नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या शिक्षकांनी थेट वेतन अधीक्षकांचे नासिक येथील कार्यालय गाठून निवेदन दिले. अधीक्षकांच्या नावे दिलेले निवेदन वेतन पथकाचे मुख्य लिपिक व्ही. डी. खोडके यांनी स्वीकारले. शिक्षकांचे पगार आॅनलाइन पगार होऊनदेखील नगरसूल विद्यालयाचे शिक्षक पगारापासून वंचित आहेत.
वेतन पथकात व्ही. डी. खोडके, एस. बी. घोडेकर, एम. पी. वाघमारे यांच्याशी नगरसूलच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. या चर्चेत शिक्षक नेते अनिल साळुंके, राज्य फेडरेशन प्रतिनिधी दत्ता महाले, सविता सौंदाणे, मंगेश नागपुरे, सुधीर
चेमटे, सुमेध कुºहाडे यांनी भाग घेतला व सहा महिने पगार का होत नाही, अशी विचारणा केली. यावर पगार बिल वेळेवर संबंधित शाळेतून वेतन पथकाकडे सादर न झाल्याने विलंब झाला असल्याचे वेतन पथकाच्या अधिकाºयांनी स्पष्ट केले. पगाराबाबत दिलेल्या निवेदनावर राज्य शिक्षक फेडरेशन प्रतिनिधी सविता सौंदाणे, शैला वसईकर, अंजना पवार, राजकुवर परदेशी, मंगेश नागपुरे, सुमित कुºहाडे, राजेंद्र बिन्नर, सुधीर चेमटे, विजय जेजूरकर, नितीन मोकळ, योगेश भालेराव, जयवंत देव्हारे, केदा अिहरे, उमाकांत आहेर, भीमराज मुंगसे, प्रकाश उगलमुगले, यांच्यासह ४५
शिक्षक शिक्षकेतरांच्या सह्या आहेत.