गोंदे दुमालात लसीकरणासाठी तोबा गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:18 AM2021-09-17T04:18:35+5:302021-09-17T04:18:35+5:30
गोंदे दुमाला : इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील आरोग्य उपकेंद्रात लसीकरणासाठी नागरिकांनी तोबा गर्दी केली. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांवर ...
गोंदे दुमाला : इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील आरोग्य उपकेंद्रात लसीकरणासाठी नागरिकांनी तोबा गर्दी केली. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांवर ताण आला. तातडीने तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भेट देत नागरिकांना शांत केले.
गोंदे दुमाला येथील आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डाॅ. घनश्याम बांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत १८ वर्षांवरील नागरिकांना तसेच पहिला डोस घेऊन ८४ दिवस संपून दुसरा डोस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांसाठी लसीकरण करण्यात येणार असल्याचे चार ते पाच दिवसांपूर्वी सांगितले होते. याच पार्श्वभूमीवर गोंदे दुमाला जिल्हा परिषद शाळेत नागरिकांनी गर्दी केली होती. आरोग्य विभागाचे कर्मचारी व ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांनी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले; परंतु नागरिकांची सतत गर्दी वाढत होती. यामुळे जत्रेचे स्वरूप प्राप्त झाल्यामुळे ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी व आरोग्य अधिकारी यांनी नागरिकांना समजावत शांत केले. गर्दीमुळे आरोग्य कर्मचारी, आरोग्यसेविका, आशासेविका यांच्यावर ताण निर्माण झाल्यामुळे बेलगाव कुऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.घनश्याम बांबळे यांनी लसीकरणस्थळी दाखल होत उपलब्ध लसींबाबत माहिती देत नियोजन करत लसीकरणाला सुरुवात केली.
-----
नागरिक ऐकण्यापलीकडे
यावेळी आशासेविका श्रीमती मेदडे व श्रीमती आहेर, श्रीमती सातपुते यांनी सुरुवातीस नागरिकांना मास्क लावून रांगेत शांततेत उभे राहण्याची विनंती केली. परंतु यावेळी नागरिकांची संख्याच इतकी होती की, लसीची संख्या त्या तुलनेत अंत्यत कमी असल्यामुळे नागरिकांनी गर्दी केली होती. यामध्ये अनेकांनी तोंडाला मास्क न लावताच रांगेत उभे राहणे, ठरावीक अंतर न ठेवता जवळच उभे राहणे यामुळे गोंदे दुमाला येथील जिल्हा परिषद शाळेत फज्जा उडाल्यामुळे येथे उपस्थित असलेल्या आरोग्य कर्मचारी यांचेदेखील नागरिक ऐकत नसल्यामुळे एकच फज्जा उडाला होता.
--------------
गोंदे दुमाला येथील जिल्हा परिषद शाळेसमोर लसीकरणासाठी नागरिकांनी केलेली गर्दी. (१६ गोंदे)
160921\16nsk_14_16092021_13.jpg
१६ गोंदे