सटाण्यात तंबाखूची साठेबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 09:12 PM2020-05-13T21:12:35+5:302020-05-14T00:44:54+5:30
सटाणा : लॉकडाऊनच्या काळात सरकारने मद्य विक्रीला परवानगी दिली. परंतु, तंबाखू, सिगारेटचे व्यसन असणाऱ्या शौकिनांची मात्र चांगलीच पंचाईत होताना दिसून येत आहे.
सटाणा : लॉकडाऊनच्या काळात सरकारने मद्य विक्रीला परवानगी दिली. परंतु, तंबाखू, सिगारेटचे व्यसन असणाऱ्या शौकिनांची मात्र चांगलीच पंचाईत होताना दिसून येत आहे. प्रामुख्याने शहरात तंबाखू काळ्याबाजारात तिपटीच्या चढ्या दराने विक्र ी केली जात आहे. त्यामुळे शौकिनांना आर्थिक झळ सोसावी लागत असल्याचे चित्र आहे.
शहरासह तालुक्यात लॉकडाऊन-पासून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंसह तंबाखू चढ्या दराने खरेदी करावी लागत आहे. लॉकडाऊनमुळे कंपन्यांकडून पुरवठा होत नसल्याचे कारण देऊन गोडेतेल, शेंगदाणे, डाळ, दुधाचे पदार्थ आदी किराणा वस्तूंसह पाण्याच्या बाटल्यादेखील ग्राहकांना चढ्या भावाने खरेदी करण्याची वेळ आली आहे. याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या असता प्रशासनाकडून पक्क्या बिलाची मागणी केली जाते. वास्तविक प्रत्येक विक्रेत्याला आपल्या दुकानासमोर वस्तूंचे दरपत्रक लावणे बंधनकारक आहे. मात्र शहरासह तालुक्यात कोणत्याही विक्रेत्याने दरपत्रक न लावता ग्राहकांची लूट सुरू केली आहे. ग्राहकांनी पक्क्या बिलाची मागणी केली तर त्याला वस्तू नाकारून कुचंबणा केली जात आहे. त्यातच गेल्या आठ दिवसांपासून तंबाखूचे भाव तिपटीने वाढले आहेत. व्यापाऱ्यांकडून तंबाखूची मोठ्या प्रमाणावर साठेबाजी करण्यात येत आहे.
तंबाकू उपलब्ध नसल्याचे सांगून १५ रु पयांची तंबाखू तब्बल ६० रु पयांना विक्र ी केली जात आहे. तंबाकू विक्र ी करणारे मोठे रॅकेटच कार्यरत असून त्याचा अड्डा शहरातील ग्रामीण रु ग्णालय परिसरात आहे.खाकीतील काही मंडळीच्या कृपाशीर्वादाने त्यांचा व्यवसाय बिनबोभाट सुरु असल्याची चर्चा आहे प्रशासनाने अशा साठेबाज करणाºया व्यापाºयांचा आणि राजरोस चढ्या भावाने विक्र ी करणाºया टोळीचा शोध घेऊन कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
----------------------------------
बनावट मद्याचा पूर..
शहर व तालुक्यात गेल्या महिनाभरापासून मद्य विक्रीचे दुकाने बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे मद्याअभावी तळीरामांचे चांगलेच हाल होत आहे. दुकाने बंद असल्याचा फायदा घेऊन सर्रास अधिकृत कंपन्यांचे लेबल लावून राजरोस बनावट मद्य तयार करून चढ्या दराने विक्र ी केली जात आहे. याचे सटाणा शहरासह नामपूर, ताहराबाद, ठेंगोडा, वीरगाव या भागात अड्डे असून, त्याची अलिशान कारने ‘होम डिलेवरी’ केली जात असल्याची चर्चा आहे.