आज मतदान साहित्याचे वाटप; यंत्रणा सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 12:49 AM2019-04-28T00:49:33+5:302019-04-28T00:50:04+5:30
लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी या दोन्ही मतदारसंघात मतदान होणार असल्याने त्यासाठी तयारी पूर्ण झाली असून, रविवारी सकाळी जिल्ह्यातील पंधराही विधानसभा मतदारसंघाच्या मुख्यालयातून मतदान कर्मचारी व अधिकाऱ्यांना निवडणुकीचे साहित्य वाटप करण्यात येणार आहे.
नाशिक : लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी या दोन्ही मतदारसंघात मतदान होणार असल्याने त्यासाठी तयारी पूर्ण झाली असून, रविवारी सकाळी जिल्ह्यातील पंधराही विधानसभा मतदारसंघाच्या मुख्यालयातून मतदान कर्मचारी व अधिकाऱ्यांना निवडणुकीचे साहित्य वाटप करण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी सुमारे २५ हजार कर्मचारी, अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून, साहित्याची वाहतूक करण्यासाठी बाराशे वाहने सज्ज ठेवण्यात आली आहेत.
सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत जिल्ह्यातील ४७२० मतदान केंद्रावर मतदान घेण्यात येणार असले तरी, मतदानपूर्व तयारीसाठी रविवारी दुपारपर्यंत त्या त्या मतदान केंद्रावरील कर्मचारी व अधिकाºयांनी हजर होऊन मतदान केंद्राची व सोमवारच्या मतदानाची तयारी पूर्ण करावी, असे नियोजन करण्यात आले आहे. या कामी सुमारे २५ हजार कर्मचाºयांची नेमणूक करण्यात आली असून, निवडणुकीपूर्वी त्यांना आजवर दोन वेळा प्रशिक्षण देऊन मतदानाची पद्धती, व्हीव्हीपॅटचा वापर व हाताळणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. त्याच मतदारसंघातील रहिवासी असलेल्या कर्मचारी, अधिकाºयाला त्याच्या विधानसभा मतदारसंघात निवडणूक कामासाठी नेमण्यात आलेले नाही. त्यामुळे निवडणूक प्रकिया पारदर्शीपणे पार
पडेल, असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे.
रविवारी सकाळी पुन्हा शेवटचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्या त्या विधानसभा मतदारसंघाच्या मुख्यालयी सहायक निवडणूक अधिकारी हे प्रशिक्षण घेतील तसेच मतदान केंद्रनिहाय कर्मचारी व अधिकाºयांना मतदानाचे साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. नाशिक शहरातील चार विधानसभा मतदारसंघासाठी शहरातूनच साहित्याचे वाटप केले जाणार आहे. त्यात नाशिक पूर्व मतदारसंघाचे साहित्य वाटप पंचवटीतील विभागीय क्रीडा संकुल येथून, नाशिक मध्य मतदारसंघाचे दादासाहेब गायकवाड सभागृह येथून, नाशिक पश्चिमचे संभाजी स्टेडियम येथे, तर देवळाली मतदारसंघाचे गोदावरी हॉल, सार्वजनिक बांधकाम भवन येथून साहित्य वाटप करण्यात येणार आहे. साहित्यानिशी कर्मचारी व अधिकाºयांची मतदान केंद्रापर्यंत वाहतूक करण्यासाठी बाराशे वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.