जनकल्याण समितीतर्फे आजपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:13 AM2021-04-25T04:13:48+5:302021-04-25T04:13:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, आयुर्वेद सेवा संघ आणि नाशिक महानगर पालिका यांच्या संयुक्त ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, आयुर्वेद सेवा संघ आणि नाशिक महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हाॅटेल राॅयल हेरीटेज, खडकाळी सिग्नलजवळ, गंजमाळ येथे ५० बेड्सचे 'कोविड केअर सेंटर अंतर्गत विलगीकरण कक्ष सुरू होत आहे. रविवारी ( दि.२५) वर्धमान जयंतीच्या मुहूर्तावर सुरू करण्यात येणाऱ्या या केंद्रातून गरजू रुग्णांना विनामूल्य सेवा देण्यात येणार आहे.
या 'कोविड सेंटरमध्ये' कोविड पॉझिटिव्ह आणि लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी व ज्यांना होम आयसोलेशनमध्ये राहण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे अशांना दाखल करून घेतले जाईल. रुग्णास दाखल करून घ्यायचा निर्णय योग्य तपासणीनंतर सर्वस्वी 'कोविड सेंटर' वरील डॉक्टरांच्या सल्ल्याने होईल. येथे जरुरीनुसार साधारण आठ ते दहा दिवसांच्या अवधीसाठी रुग्णाला दाखल करून घेतले जाणार आहे. रुग्ण कोविड सेंटरमध्ये असतांना त्याच्यासाठी आहार, वैद्यकीय काढे, जरुरीप्रमाणे व्यायाम तसेच त्यांची मनस्थिती सकारात्मक रहावी यासाठीचे विशेष कार्यक्रम यांचे दिवसभराचे नियोजन येथील डॉक्टर्स आणि प्रशासनाने केले आहे. ही संपूर्ण सेवा निःशुल्क राहणार आहे. गरजू नागरिकांनी या विलगीकरण कक्ष सुविधेचा लाभ घेण्यासाठी ८४४६५९९२११ आणि ८४४६५९९३११ क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.