आज चंपाषष्ठी धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल : नैवेद्यासाठी भरताच्या वांग्यांची बाजारात मोठी उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:12 AM2017-11-24T00:12:42+5:302017-11-24T00:18:30+5:30

Today Champagishi Religious Programs will flourish: A huge turnover in the market for renovations | आज चंपाषष्ठी धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल : नैवेद्यासाठी भरताच्या वांग्यांची बाजारात मोठी उलाढाल

आज चंपाषष्ठी धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल : नैवेद्यासाठी भरताच्या वांग्यांची बाजारात मोठी उलाढाल

Next
ठळक मुद्देआज चंपाषष्ठी धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल : नैवेद्यासाठी भरताच्या वांग्यांची बाजारात मोठी उलाढाल यळकोट यळकोट जय मल्हार, देवळाली कॅम्प येथील श्री खंडोबा महाराज टेकडीवरील मंदिरावर चंपाषष्ठी

नाशिक : अवघ्या महाराष्टÑाचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाची चंपाषष्ठीला उपासना केली जाते. ‘यळकोट यळकोट जय मल्हार’चा गजर करण्यासाठी भाविक सज्ज झाले असून, शहरातील खंडेराव मंदिरांमध्ये सजावट, रंगरंगोटी, धार्मिक कार्यक्रमांची तयारी, दर्शन नियोजन आदींची लगबग पहायला मिळत आहे. सातपूर, पेठरोड, सिडको, नाशिक आणि देवळाली कॅम्प येथील खंडेराव मंदिरांमध्ये चंपाषष्ठीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि.२४) यात्रोत्सव होणार असून, भाविकांची गर्दी लक्षात घेता विश्वस्तांनी नियोजनावर भर दिला आहे. यात्रोत्सवासाठी मंदिरांवर रोषणाई करण्यात आली असून, पिवळ्या पताकांनी मंदिराचा परिसर झळाळून निघाला आहे. बेल-भंडारा उधळीत देवाची तळी भरण्यासाठी नाशिककरांची येथे सकाळपासून वर्दळ सुरू होणार आहे.
देवळाली कॅम्प येथील खंडोबा टेकडीवर आमले परिवाराच्या वतीने पूजा होणार आहे. त्यानंतर सकाळी भगूर येथून पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. खंडोबा टेकडीवर मिरवणुकीचा समारोप होईल. दुपारी १२ वाजता महाआरती व नैवेद्य दाखविल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळीदेखील पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. सायंकाळी ५ वाजता खंडेराव भक्त उत्तम मांडे हे १२ बैलगाड्या ओढणार आहेत.
 

Web Title: Today Champagishi Religious Programs will flourish: A huge turnover in the market for renovations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.