सटाण्यात आजपासून मका खरेदी-विक्र ी

By Admin | Published: November 17, 2016 10:46 PM2016-11-17T22:46:16+5:302016-11-17T22:44:02+5:30

सटाण्यात आजपासून मका खरेदी-विक्र ी

Today, corn-buying and selling | सटाण्यात आजपासून मका खरेदी-विक्र ी

सटाण्यात आजपासून मका खरेदी-विक्र ी

googlenewsNext

सटाणा : सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती, मार्केटिंग फेडरेशन आणि सटाणा दक्षिण सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारपासून (दि.१८) मका खरेदी-विक्री केंद्राचा शुभारंभ केला जाणार आहे. केंद्र सरकारने मक्याला एक हजार ३६५ रुपयांचा हमी भाव दिला असून, याच भावाने मका खरेदी केली जाणार असल्याची माहिती बाजार समितीचे मुख्य प्रशासक रमेश देवरे व उपमुख्य प्रशासक विशाल सोनवणे यांनी दिली आहे.
कसमादे पट्ट्यात मक्याचे पीक मोठ्या प्रमाणावर घेण्यात आले असून, मका पिकाला शासनाकडून हमीभाव मिळून शासनाच्या माध्यमातून त्याची खरेदी करण्यात यावी यासाठी सटाणा बाजार समितीकडून दोन महिन्यांपासून पाठपुरावा सुरू होता. अखेर बाजार समिती, मार्केटिंग फेडरेशन आणि दक्षिण सोसायटी यांच्या संयुक्त प्रयत्नांना यश आले असून, शुक्रवारपासून शहरातील मालेगाव रोडवरील वखार महामंडळाच्या आवारात तहसीलदार सुनील सैंदाणे यांच्या उपस्थितीत मका खरेदी-विक्र ी केंद्राचा शुभारंभ केला जाणार आहे.
मका उत्पादक शेतकऱ्यांनी १४ टक्क्यांच्या आत आर्द्रता असलेला मका विक्रीसाठी आणावा. सातबारा उताऱ्यावर मका नोंद असणे आवश्यक असून, शेतकऱ्यांनी सातबारा उतारा, आधार कार्ड व बँक पासबुक सोबत आणावे, असे आवाहन बाजार समितीचे मुख्य सचिव भास्कर तांबे यांनी केले आहे. (वार्ताहर)

Web Title: Today, corn-buying and selling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.