आज उमेदवारी अर्ज माघारीचा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2019 11:41 PM2019-10-06T23:41:39+5:302019-10-06T23:42:07+5:30
नाशिक : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २१२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्यानंतर सोमवारी (दि. ७) होणाऱ्या अर्ज माघारीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. जिल्ह्यात प्रचंड राजकीय उलथापालथ झाल्यामुळे अंतिम क्षणी कोण कुणासाठी माघार घेणार आणि पक्षीय पातळीवरून कोणते आदेश प्राप्त होतात यावर माघारी नाट्य रंगणार आहे. सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया सुरू होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघासाठी २४३ उमेदवारांनी ३४५ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या अर्जांची शनिवारी छाननी होऊन २१२ इतके उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. अवैध ठरलेल्या अर्जांमध्ये अपक्ष आणि डमी उमेदवारांच्या अर्जांची संख्या मोठी आहे. युती, आघाडीच्या अधिकृत उमेदवारांची अर्ज दाखल केल्यानंतरही अनेक बंडखोरांचे अर्ज असल्यामुळे ऐनवेळी कोण माघार घेणार याकडेदेखील सर्वांचे लक्ष असणार आहे. नाशिक शहरात सर्वाधिक हायव्होल्टेज ड्रामा नाशिक पूर्व आणि नाशिक पश्चिम या दोन्ही मतदारसंघांत पहायला मिळू शकतो. त्याचप्रमाणे येवला, दिंडोरी, कळवण या मतदारसंघांतूनदेखील कोण निवडणूक रिंगणात राहणार याकडे लक्ष असणार आहे.अर्ज छाननीनंतर नांदगावमधून २८, मालेगाव (मध्य) १४, मालेगाव (बाह्य)११, बागलाण १५, कळवण ८, चांदवड १४, येवला १४, येवला १४, सिन्नर १०, निफाड ९, दिंडोरी ८, नाशिक पूर्व १४, नाशिक मध्य १०, नाशिक पश्चिम २९, देवळाली १६, इगतपुरी १२ याप्रमाणे २१२ अर्ज वैध ठरलेले आहेत.