आयटीआय प्रथम फेरी प्रवेशासाठी आज अखेरची मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 01:33 IST2020-09-15T00:28:13+5:302020-09-15T01:33:29+5:30
नाशिक: सातपूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सत्र आॅगस्ट 2020 साठी असलेल्या प्रथम फेरी प्रवेशासाठी 15 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे म्हणजेच मंगळवारी (दि 15) अखेरचा दिवस असल्याचे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य रा.सु.मानकर यांनी कळविले आहे.

आयटीआय प्रथम फेरी प्रवेशासाठी आज अखेरची मुदत
नाशिक: सातपूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सत्र आॅगस्ट 2020 साठी असलेल्या प्रथम फेरी प्रवेशासाठी 15 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे म्हणजेच मंगळवारी (दि 15) अखेरचा दिवस असल्याचे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य रा.सु.मानकर यांनी कळविले आहे.
प्रथम फेरी प्रवेश 9 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर या कालावधीत होणार होते; मात्र संचलनालयाकडून आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार या साठी 15 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
ज्या विद्यार्थ्यांची निवड प्रथम फेरी प्रवेशासाठी झालेली अशा विद्यार्थ्यांनी सातपूर येथील संस्थेत 15 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपस्थित राहून प्रवेश निश्चित करावा, असेही प्राचार्य मानकर यांनी कळविले आहे.