आरटीई प्रवेशाची आज पहिली सोडत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 01:11 AM2018-03-13T01:11:52+5:302018-03-13T01:11:52+5:30
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राखीव २५ टक्के जागांवर प्रवेशप्रक्रि या राबविण्यात येत असून, मंगळवारी (दि.१३) दुपारी १२ वाजता पहिली सोडत काढण्यात येणार आहे.
नाशिक : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राखीव २५ टक्के जागांवर प्रवेशप्रक्रि या राबविण्यात येत असून, मंगळवारी (दि.१३) दुपारी १२ वाजता पहिली सोडत काढण्यात येणार आहे. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत जिल्ह्यातील ४६६ शाळांमधील ६,५८९ जागांसाठी सुमारे दहा हजार ४१६ प्रवेश अर्ज प्राप्त झाले असून, या अर्जांच्या आधारे जिल्हाधिकारी कार्याल-यासमोरील शासकीय कन्या शाळेत मंगळवारी पहिली सोडत काढण्यात येणार आहे. आर्थिक दुर्बल घटाकांतील विद्यार्थ्यांना प्राथमिक पूर्व व पहिलीसाठी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये मोफत प्रवेशासाठी आरटीई कायद्यामुळे संधी मिळते. त्यामुळे जिल्हाभरातून सुमारे दहा हजार ४१६ विद्यार्थ्यांच्या पालकांनी या प्रक्रियेअंतर्गत अर्ज केले आहेत. यापैकी सोडत पद्धतीने प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर होणार असून, विद्यार्थ्यांच्या पालकांना त्यासंबंधीची माहितीही मोबाइल संदेशाद्वारे दिली जाणार आहे. प्रवेशाची संधी मिळ-णाºया विद्यार्थ्यांचे पालक १४ ते २४ मार्च या कालावधीत प्रवेश घेऊ शकतील. यानंतर रिक्त असणाºया जागांसाठी दि. २८ ते ३१ मार्च या कालावधीत दुसरी सोडत निघणार असून, दि.२ ते १२ एप्रिल दरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करता येणार आहे. पुणे येथील शिक्षण संचालक कार्यालयात सोडत पद्धत राबविण्यात येणार असून, या प्रक्रियेचे थेट प्रेक्षपण नाशिकमध्येही पहायला मिळणार असल्याने या प्रक्रियेची पारदर्शकता राखली जाणार आहे. त्यासाठी शासकीय कन्या शाळेत प्रोजेक्टरची व्यवस्था करण्यात आली आहे.