घैसास गुरुजी जन्मशताब्दी महोत्सवाची आज सांगता
By admin | Published: February 1, 2016 10:50 PM2016-02-01T22:50:33+5:302016-02-01T22:56:17+5:30
घैसास गुरुजी जन्मशताब्दी महोत्सवाची आज सांगता
त्र्यंबकेश्वर : श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरचे भूमिपुत्र व कर्मभूमी पुण्यात असलेले कै.वेदमहर्षी विनायक भट्ट घैसास गुरुजी यांचा जन्मशताब्दी महोत्सव सुरू असून, मंगळवारी (दि.२) समारोप होणार आहे.
गेल्या पाच दिवसांपासून दररोज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी ७.३० वा. येथील हरगोविंददास जीवनदास संस्कृत पाठशाळा १८६५ मध्ये व्याकरणाचार्य पं.नथू शास्त्री पाटणकर यांनी स्थापन केली होती. ही संस्कृत पाठशाळा मुंबईच्या भारतीय विद्याभवन मुंबई या संस्थेशी संलग्न आहे. या पाठशाळेला वेदमहर्षी कै. विनायक घैसास सरस्वती उपासना पुरस्कार देण्यात येऊन गौरविण्यात आले. दि. २६ रोजी प. पू. शंकराचार्य वासुदेवानंद स्वामी महाराज यांच्या हस्ते ब्रह्मध्वजारोहण करण्यात आले. यावेळी स्थलशुद्धयर्थ उदकशांत, २२ ऋग्वेद संहिता प्रधान संकल्प, गणपती पूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध, आचार्यावरण मुख्यदेव स्थापन, ग्रहस्थापन, ग्रहदोष संहिता स्नाहाकारास प्रारंभ पाचआळीमधील श्री परशुराम मंदिरात हा सोहळा संपन्न झाला. दि. २७ रोजी रस्त्याचे नामकरण शंकराचार्याचे पाद्य पूजन होऊन मिरवणूक व शोभायात्रा, दि. २७ ते १ फेब्रुवारी या काळात चतुर्वेद पारायण पूर्वक ऋग्वेदसंहिता महायज्ञ महायज्ञ तर कै. विनायक भट्ट घैसास गुरुजी यांचे जन्मशताब्दीनिमित्त महाभिषेकपूर्वक रक्तदान शिबिर झाले. दि. २ रोजी महायज्ञपूर्णाहूती व दुपारी महाप्रसाद होऊन त्र्यंबकेश्वर येथील कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
वर्षभराच्या जन्मशताब्दी महोत्सावत १४ ते २० फे्रु. प्रयाग, रविवार २१ ते २७ फेब्रु. श्रीक्षेत्र गया.. २८ मार्च ते ४ एप्रिल श्रीक्षेत्र काशी (वाराणसी) २८ एप्रिल ते ४ से श्रीक्षेत्र हरिद्वार (देवभूमी) ८ ते १४ बंगळुरु (बेंगलोर), २६ जून ते २ जुलै गोकर्ण महाबळेश्वर (कर्नाटक), २० आॅगस्ट ते २७ आॅगस्ट पुणे (एरंडवण) ११ सप्टे. १६ सप्टें. पारनेर जि. अहमदनगर, १७ ते २३ आॅक्टो वास्को, गोवा, १ ते २६ नोव्हें श्रीक्षेत्र उज्जैन (मध्यप्रदेश), १९ ते २५ डिसेंबर नागपूर (महाराष्ट्र) १७ ते २३ जानेवारी वेदभवन पुणे कै. घैसास गुरुजी वेद पाठशाळा पुणे असा वर्षभर जन्मशताब्दीचा कार्यक्रम निश्चित केला असल्याची माहिती मोरेश्वर घैसास यांनी दिली. दरम्यान त्र्यंबकेश्वर येथील जन्म शताब्दी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुरलीधर थेटे, स्वागताध्यक्ष किशोर पाटणकर आहेत. (वार्ताहर)