सटाण्यात आज सिंचनप्रश्नी बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 12:09 AM2018-03-10T00:09:38+5:302018-03-10T00:09:38+5:30
सटाणा : बागलाण तालुक्यातील वळण योजनांची पाहणी व प्रलंबित सिंचन योजना व दत्तक घेतलेल्या साल्हेरच्या विकास आराखड्याचा आढावा घेण्यासाठी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि.१०) आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
सटाणा : बागलाण तालुक्यातील वळण योजनांची पाहणी व प्रलंबित सिंचन योजना व दत्तक घेतलेल्या साल्हेरच्या विकास आराखड्याचा आढावा घेण्यासाठी संरक्षण राज्यमंत्री तथा धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि.१०) आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. हरणबारी डावा-उजवा कालवा, तळवाडे-भामेर पोहोच कालवा, केळझर चारी क्र मांक आठ व वळण योजनांसंदर्भात आढावा घेण्यासाठी डॉ. भामरे यांनी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध खात्यांच्या प्रमुखांची बैठक बोलावली आहे. शनिवारी दुपारी २ वाजता साल्हेर येथे होणाºया या आढावा बैठकीपूर्वी पाणी उपलब्धतेअभावी तालुक्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांच्या कामांना गती देण्यासाठी प्रस्तावित वळण योजनांची पाहणी करण्यात येणार आहे. त्यानंतर साल्हेरची पाहणी करून विकास आराखडा तयार करण्यासाठी चर्चा करण्यात येणार आहे, असे कळवण्यात आले आहे. त्यानंतर साल्हेर येथील शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक घेण्यात येणार आहे.या बैठकीस तापी खोरे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता ,स्थानिक स्तरचे अधीक्षक अभियंता ,जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता ,जिल्हापरिषद लघुप्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता ,आदिवासी विकास विभागाचे आयुक्त ,जिल्हापरिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी ,कळवणचे प्रकल्प अधिकारी ,वीज महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता ,दूरसंचार विभागाचे महाप्रबंधक ,जिल्हा आरोग्य अधिकारी ,कृषी अधीक्षक ,परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक यांच्यासह तालुक्यातील विविध विभाग प्रमुख उपस्थित राहणार आहेत.