आज श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 01:38 AM2019-08-23T01:38:23+5:302019-08-23T01:38:51+5:30
नाशिक : शहर व परिसरातील श्रीकृष्ण मंदिरांमध्ये जन्माष्टमीनिमित्त शुक्रवारी (दि. २३) विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यासाठी मंदिरांवर आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
नाशिक : शहर व परिसरातील श्रीकृष्ण मंदिरांमध्ये जन्माष्टमीनिमित्त शुक्रवारी (दि. २३) विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यासाठी मंदिरांवर आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
दरवर्षी हा उत्सव पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा केला जातो. शनिवारी (दि.२४) जन्मोत्सवनिमित्त दहीहंडी फोडण्यात येणार आहे. कापड बाजारातील श्री मुरलीधर मंदिरातही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीकृष्ण जयंतीनिमित्त रविवारी मध्यरात्रीपर्यंत उपवास केला जातो. पंचवटी कारंजा येथे नवनीत प्रियाजी कृष्ण मंदिर, केवडीबन येथील जलाराम मंदिरातही श्रीकृष्ण जन्मोत्सव गुजराथी भाविकांकडून साजरा केला जाणार आहे. तसेच जुना आडगाव नाका येथील स्वामीनारायण मंदिरातही श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे.
संध्याकाळी ६ वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. सकाळी मंगल आरती, महामंत्र जप, दर्शन आरती, श्रीमद्भागवत प्रवचन-कीर्तन होणार आहेत. त्यानंतर नऊ ते रात्री अकरापर्यंत महाभिषेक करण्यात येणार आहेत. ११.३० ते १२ वाजेपर्यंत महाआरती होऊन श्रीकृष्ण जन्म साजरा होणार आहे.