मतदार याद्या पडताळणीचा आज अखेरचा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:31 AM2020-12-15T04:31:40+5:302020-12-15T04:31:40+5:30
जिल्हा निवडणूक शाखेकडून मतदार याद्या अद्ययावतीकरणाची मोहीम सातत्याने राबविली जात आहे. यासाठी निवडणूक कर्मचारी कार्यरत आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील मतदार ...
जिल्हा निवडणूक शाखेकडून मतदार याद्या अद्ययावतीकरणाची मोहीम सातत्याने राबविली जात आहे. यासाठी निवडणूक कर्मचारी कार्यरत आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील मतदार याद्या अद्ययावतीकरणाची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. १ जानेवारी २०२१ च्या अर्हता दिनांकावर १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या मतदारांना मतदार यादीत आपले नाव नोंदणी करण्याची संधी या मोहिमेमुळे मिळणार आहे. १५ डिसेंबरपर्यंत संबंधित मतदारांनी नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी केले होते. मे महिन्यात मतदार यादी अंतिम करणे अपेक्षित होते; परंतु कोरोनामुळे ते होऊ शकले नाही, शिवाय पडताळणीचा सप्टेंबरचा कार्यक्रमदेखील रद्द करावा लागला. त्यामुळे आता राज्य निवडणूक विभागाच्यावतीने राज्यात मतदार नोंदणीचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
नवीत मतदारांच्या नावांचा समावेश झाल्यानंतर अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. जिल्ह्यात नुकतीच प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झालेली आहे. त्यावर दावे आणि हरकती सुरू आहेत. त्यावरील सुनावणीनंतर अंतिम नावांचा अंतिम मतदार यादीत समावेश केला जाईल.