आज फक्त विभागीय कार्यालयात ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 01:08 AM2021-05-01T01:08:45+5:302021-05-01T01:10:18+5:30

कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठीच्या तरतूदी विचारात घेऊन राज्यात महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६१वा वर्धापन दिन समारंभ गतवर्षी प्रमाणेच, अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात येणार असून, महाराष्ट्र दिनाचा मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम शनिवारी १ मे रोजी नाशिकरोड विभागीय आयुक्त कार्यालयात सकाळी ८ वाजता  करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी दिली आहे.

Today only flag hoisting at the divisional office | आज फक्त विभागीय कार्यालयात ध्वजारोहण

आज फक्त विभागीय कार्यालयात ध्वजारोहण

Next

नाशिक : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची वाढती रुग्ण संख्या विचारात घेऊन कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी व सदर विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने १ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत राज्यात संचारबंदीसह कडक निर्बंध लागू केलेले आहेत.  
कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठीच्या तरतूदी विचारात घेऊन राज्यात महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६१वा वर्धापन दिन समारंभ गतवर्षी प्रमाणेच, अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात येणार असून, महाराष्ट्र दिनाचा मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम शनिवारी १ मे रोजी नाशिकरोड विभागीय आयुक्त कार्यालयात सकाळी ८ वाजता  करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी दिली आहे. शासनाने यासंदर्भात दिलेल्या निर्देशानुसार,  जिल्हा मुख्यालयात सकाळी ८ वाजता फक्त ध्वजारोहण विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी होणार आहे. या ध्वजारोहणप्रसंगी पालकमंत्री छगन भुजबळ, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, महापौर सतीश कुलकर्णी, जिल्हाधिकारी  सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय्, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड एवढेच पदाधिकारी व अधिकारी उपस्थित राहणार आहेत. 

Web Title: Today only flag hoisting at the divisional office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.