इंजिनिअरिंग, फार्मसीसाठी आज गुणवत्ता यादी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 12:23 AM2018-06-24T00:23:49+5:302018-06-24T00:24:08+5:30
इंजिनिअरिंग व फार्मसी या पदवी शिक्षणक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज करण्याची वाढीव मुदत गुरु वारी (दि. २१) संपली. आता विद्यार्थ्यांचे लक्ष गुणवत्ता यादीकडे लागले असून, रविवारी (दि. २४) पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.
नाशिक : इंजिनिअरिंग व फार्मसी या पदवी शिक्षणक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज करण्याची वाढीव मुदत गुरु वारी (दि. २१) संपली. आता विद्यार्थ्यांचे लक्ष गुणवत्ता यादीकडे लागले असून, रविवारी (दि. २४) पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. त्यानंतर २५ ते २८ जून कॅप राउंड-१ नुसार जागावाटप होईल, तर ३० जून ते ४ जुलै यादरम्यान रिपोर्टिंग सेंटरद्वारे (एआरसी) प्रवेश घेता येईल. फार्मसीसाठी २४ जून रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर होईल. २४ ते २७ जून यादरम्यान कॅप राउंड-१ असेल, तर २९ जून ते २ जुलै रोजी रिपोर्टिंग सेंटरद्वारे प्रवेश घेता येणार आहे.
एमबीए आॅनलाइन अर्जांची मुदत
व्यवसाय व्यवस्थापन शास्त्र पदव्युत्तर पदवी (एमबीए) अभ्यासक्रम प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना गुुरुवारपर्यंत (दि. २८) आॅनलाइन अर्ज दाखल करता येणार असून, याच कालावधीत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रही संकेतस्थळावर अपलोड करावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे आॅनलाइन दाखल केलेल्या अर्जांची पडताळणी व निश्चितीही विद्यार्थ्यांना गुरुवारपर्यंतच करून घ्यावी लागणार आहे. २९ जून रोजी प्रारूप गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.
मार्गदर्शन कार्यशाळा
एमबीए व एमसीए प्रवेशप्रक्रियेविषयी मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. मुंजे इन्स्टिट्यूटमध्ये मंगळवारी (दि. २६) सकाळी साडेदहा वाजता कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेत एमबीए व एमसीए प्रवेशप्रक्रियेची माहिती तज्ज्ञांकडून दिली जाणार आहे.
थेट द्वितीय वर्ष पॉलिटेक्निकसाठी अर्ज करण्याची संधी
तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) अभ्यासक्र माच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेशप्रक्रिया २१ जूनपासून सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना १६ जुलैपर्यंत आॅनलाइन पद्धतीने प्रवेश अर्जासह आवश्यक कागदपत्र अपलोड करावे लागणार आहे. तर थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी २५ जूनपासून १२ जुलैपर्यंत प्रवेश अर्ज भरता येणार आहे. थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी १३ जुलैला प्रारूप गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.