आज शाळांचे निकाल लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2019 12:46 AM2019-05-01T00:46:22+5:302019-05-01T00:47:16+5:30

शहरासह जिल्हाभरातील सर्व शाळांमध्ये निकाल दि. १ मे रोजी निकाल जाहीर होणार असून, महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळांमध्ये ध्वजारोहण करून विद्यार्थ्यांना निकालपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे.

 Today the results of the schools will be decided | आज शाळांचे निकाल लागणार

आज शाळांचे निकाल लागणार

Next

नाशिक : शहरासह जिल्हाभरातील सर्व शाळांमध्ये निकाल दि. १ मे रोजी निकाल जाहीर होणार असून, महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळांमध्ये ध्वजारोहण करून विद्यार्थ्यांना निकालपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. शाळांनी निकालाची तयारी पूर्ण केली असून, सकाळी विद्यार्थ्यांच्या हाती निकाल पडणार आहे. दरम्यान, बच्चे कंपनीला आपल्या निकालाची आणि पुढील वर्गाची उत्सुकात आहे.
शिक्षण संचालकांच्या आदेशानुसार शाळांचे निकाल नियमानुसार १ मे रोजी जाहीर केले जाणार असल्याने त्याबाबतचे आदेश शिक्षणाधिकारी आणि महापालिका क्षेत्रात प्रशासन अधिकाऱ्यांनी सर्वसंबंधित शाळांना दिले आहेत. महापालिका हद्दीतील सर्व माध्यमांच्या खासगी आणि मनपा शाळांचे निकाल जाहीर केले जाणार आहेत. शाळास्तरावर निकाल तयार करण्यात आले असून, मुख्याध्यापकांच्या मान्यतेने विद्यार्थ्यांना निकालाचे वाटप केले जाणार आहे. राज्यभरातील विविध शाळांमध्ये १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण करून शाळेचा निकाल जाहीर करण्याची परंपरा आहे. त्यामुळे सर्व शाळांमध्ये चार-पाच दिवस अगोदरच विद्यार्थ्यांचे निकालपत्र तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
यावर्षी नाशिक जिल्ह्यात २९ एप्रिलला सतराव्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असल्याने बहुतांशी शिक्षकांवर निवडणुकीची जबाबदारी सोपविण्यात आलेली होती. यावेळी शिक्षकांनी यावेळी परीक्षा संपल्यानंतर तत्काळ निकालपत्र तयार करून ठेवले होते.
१७ जूनला उघडणार शाळा
प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिलेल्या आदेशानुसार यंदा उन्हाळी सुटीनंतर शाळा १७ जून रोजी सुरू होणार आहेत. वास्तविक शाासनाच्या नियमानुसार शाळा दरवर्षी १५ जूनला उघडणे अपेक्षित आहे. मात्र यंदा १५ जून रोजी शनिवार आणि १६ रोजी रविवार असल्यामुळे यंदा शाळा सोमवार, दि. १७ जून रोजी उघडणार आहेत.

Web Title:  Today the results of the schools will be decided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.