आज संत नामदेव महाराज पालखी सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 12:59 AM2017-07-21T00:59:21+5:302017-07-21T00:59:36+5:30

आज संत नामदेव महाराज पालखी सोहळा

Today, Sant Namdev Maharaj Palakhi Sawal | आज संत नामदेव महाराज पालखी सोहळा

आज संत नामदेव महाराज पालखी सोहळा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : संत नामदेव महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त नाशिक शहर नामदेव शिंपी पंच मंडळाच्या वतीने पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार (दि. २१) दुपारी ५ वाजता काजीपुरा विठ्ठल मंदिरापासून पालखी सोहळ्याला सुरुवात होणार आहे. तसेच दि. २२ रोजी सकाळी ८ वाजता महाभिषेक, सकाळी १० वाजता संजीवन अभंग महादीपोत्सव, महाआरती सोहळा, दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २३ रोजी दुपारी ४ वाजता समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व हरिनाम सप्ताहातील विविध विजेत्यांना गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन नंदलाल काळे, अरुण नेवासकर, प्रवीण पवार आदिंनी केले आहे.

Web Title: Today, Sant Namdev Maharaj Palakhi Sawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.