आज शिवजयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 02:16 AM2020-02-19T02:16:17+5:302020-02-19T02:19:51+5:30
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला मंगळवारी (दि. १८) शिवप्रेमींनी शहरातील विविध भागांत दुचाकी, चारचाकी वाहनांतून फेरी काढत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष केला. शिवप्रेमींनी ठिकठिकाणी नियोजित केलेल्या विविध कार्यक्रमांच्या तयारीमुळे शहराला भगवी झालर प्राप्त झाली आहे. दरम्यान, बुधवारी (दि.१९) सायंकाळी वाकडी बारव येथून पारंपरिक मार्गाने मिरवणूक काढण्यात येणार आहे.
नाशिक : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला मंगळवारी (दि. १८) शिवप्रेमींनी शहरातील विविध भागांत दुचाकी, चारचाकी वाहनांतून फेरी काढत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष केला. शिवप्रेमींनी ठिकठिकाणी नियोजित केलेल्या विविध कार्यक्रमांच्या तयारीमुळे शहराला भगवी झालर प्राप्त झाली आहे. दरम्यान, बुधवारी (दि.१९) सायंकाळी वाकडी बारव येथून पारंपरिक मार्गाने मिरवणूक काढण्यात येणार आहे.
शिवजयंतीनिमित्त शहरातील शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण असून, या उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. शहरातील चौकाचौकांमध्ये भगवे ध्वज, भगव्या पताका, मोठ्या आकारातील होर्डिंग्ज यांसह विद्युत रोषणाई करण्यात आल्याने शहरातील वातावरणात चैतन्य निर्माण झाले आहे. ढोल-ताशासोबतच पारंपरिक वाद्याच्या तालात निघणाऱ्या या मिरवणुकीत भवानी तलवारीची ही प्रतिकृती पाहण्याची शिवप्रेमींमध्ये उत्सुकता असल्याने मिरवणूक मार्गावर मोठ्या प्रमाणात शिवभक्तांची गर्दी पहायला मिळणार आहे. संपूर्ण शहरातून मिरवणुकीत सहभागी होणाºया शिवप्रेमींच्या स्वागतासाठी मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी मंच उभारण्यात आले.
भवानी तलवारीला मान
शिवजयंतीनिमित्त बुधवारी (दि.१९) ‘वंडर बुक आॅफ रेकॉर्ड्स इंटरनॅशनल लंडन’मध्ये नोंदणी झालेली १३० किलो वजनाची, १३ फूट लांब ९ इंच रुंद पाते असलेल्या भवानी तलवारीच्या प्रतिकृतीचा मानाच्या पहिल्या मिरवणुकीत समावेश करण्यात येणार आहे.
असा असेल मिरवणुकीचा मार्ग
जुने नाशिक परिसरातील वाकडी बारव येथून निघणारी मिरवणूक चौक मंडई, दादासाहेब फाळकेरोड, भद्र्रकाली मार्के ट, संत गाडगे महाराज पुतळा, मेनरोड, धुमाळ पॉइंट, महात्मा गांधीरोड, मेहेर सिग्नल, अशोकस्तंभ, नवीन तांबट अळी, रविवार कारंजा, होळकर पूल, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी कारंजा, मालवीय चौकमार्गे रामकुंडावर पोहोचणार आहे.