आज विजयादशमी ; नवरात्रीच्या उपवासांची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 12:36 AM2018-10-18T00:36:45+5:302018-10-18T00:37:21+5:30
आश्विन शुद्ध दशमी अर्थात विजयादशमीचा सण गुरुवारी (दि.१८) शहरात विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. नवरात्रीच्या उपवासांची सांगता, कुळधर्म-कुळाचार, महापूजा, आरती, सीमोल्लंघन, महाप्रसाद, सायंकाळी रावणदहन व एकमेकांना आपट्याची पाने देत सोनेरी शुभेच्छाही दिल्या जाणार आहेत.
नाशिक : आश्विन शुद्ध दशमी अर्थात विजयादशमीचा सण गुरुवारी (दि.१८) शहरात विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. नवरात्रीच्या उपवासांची सांगता, कुळधर्म-कुळाचार, महापूजा, आरती, सीमोल्लंघन, महाप्रसाद, सायंकाळी रावणदहन व एकमेकांना आपट्याची पाने देत सोनेरी शुभेच्छाही दिल्या जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि.१७) रात्री उशिरापर्यंत नाशिककरांची खरेदी व तयारीची लगबग पहायला मिळाली. शहरात सर्वत्र मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांची आणि आपट्याच्या पानांची विक्री झाली. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या मुहूर्तावर सोने, चांदी, हिरे, मोती, गृहोपयोगी साहित्य, वाहन, सदनिका आदींची खरेदीही होणार असल्याने बाजारात विविध आकर्षक आॅफर्सची धूम पहायला मिळत आहे. विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व देवी मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे. दर्शनासाठी दिवसभर भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेसलेला आहे. नवरात्रोत्सवातील उपवासांची सांगता नैवेद्य दाखवून होणार असून, नैवेद्यासाठी श्रीखंड, गुलाबजाम, अंगुरमलाई आदी मिठाई
खरेदीसाठी दुकानांवर गर्दी पहायला मिळाली.
अष्टमीनिमित्त उपवास, देवदर्शन, चक्रपूजा, दसºयाची तयारी यांची लगबग पहायला मिळाली. ज्यांना नवरात्राचे नऊ दिवस उपवास करणे शक्य नसते, असे भक्त अष्टमीला उपवास करतात. काही ठिकाणी अष्टमीला फुलोरा तयार करण्याची परंपराही आहे. त्याचीही लगबग बघायला मिळाली.