पोस्टल कर्मचाऱ्यांचे आज द्विवार्षिक अधिवेशन
By admin | Published: November 1, 2014 10:00 PM2014-11-01T22:00:03+5:302014-11-01T22:05:15+5:30
पोस्टल कर्मचाऱ्यांचे आज द्विवार्षिक अधिवेशन
सिन्नर : आॅल इंडिया पोस्टल इम्प्लॉइज युनियनचे रौप्यमहोत्सवी द्विवार्षिक संयुक्त अधिवेशन नाशिक येथील प्रधान कार्यालयातील रिक्रिएशन क्लब हॉल येथे रविवारी सकाळी ११.३० वाजता होणार असल्याची माहिती आर.एम. परघरमोल, सुभाष दराडे व सुनील जगताप यांनी दिली.
रौप्यमहोत्सवी या संयुक्त द्विवार्षिक अधिवेशनात नाशिक विभागीय शाखेचे वर्ग-३, वर्ग-४ व ग्रामीण डाक सेवक सहभागी होणार आहेत. संघटनेचे मुंबई विभागाचे सचिव मंगेश परब, जगदीश पवार, ए. पी. वग्गावाड, सुरेंद्र पालव, बाळकृष्ण चाळके, डी.एच. परदेशी, डी.एन. गिरी, एम. डी. आहिरे आदि संघटनेचे पदाधिकारी उपस्थितीत राहून मार्गदर्शन करणार आहेत. महागाई भत्ता ५० टक्के मूळ वेतनात समाविष्ट करणे, सर्व कर्मचाऱ्यांना अंतरिम वाढ देणे, सातव्या वेतन आयोगात ग्रामीण डाक सेवकांचा समावेश करणे, रिक्त पदे त्वरित भरणे, सातवा वेतन आयोग लागू करणे आदिंसह विविध कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर यावेळी चर्चा करण्यात येणार आहे. यावेळी पोस्ट खात्यातील कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन एनएफपीइच्या वतीने करण्यात आले आहे. (वार्ताहर)