‘मुक्त’चा आज दीक्षांत सोहळा

By admin | Published: February 7, 2017 01:08 AM2017-02-07T01:08:46+5:302017-02-07T01:09:03+5:30

गुणगौरव : दीड लाख विद्यार्थ्यांना मिळणार पदवी

Today's Convocation Function of 'Free' | ‘मुक्त’चा आज दीक्षांत सोहळा

‘मुक्त’चा आज दीक्षांत सोहळा

Next

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा २३ वा दीक्षांत सोहळा मंगळवार, दि. ७ रोजी विद्यापीठाच्या नाशिक येथील मुख्यालयात सायंकाळी ४ वाजता होणार आहे. यावर्षी सुमारे १ लाख ४० हजार ४८४ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार असून, यामध्ये ६१ कैदी बांधवांचा समावेश आहे. पीएचडीचे १७ विद्यार्थी यावेळी पदवी ग्रहण करणार आहेत.  या पदवी प्रदान सोहळ्यासाठी कृष्णा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सचे कुलपती दत्ता मेघे व इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सचे प्र-कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा हे उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर राहणार आहेत. यावर्षी पदवी, पदविका घेणाऱ्यांमध्ये राज्यातील १ लाख ४० हजार ४८४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. समारंभात १ लाख १४ हजार ६४३ पदवी, २१ हजार ११ पदविका, ४ हजार ८१३ पदव्युत्तर पदविका तर पीएचडीच्या १७ विद्यार्थ्यांना पदवी बहाल केली जाणार आहे.  पदवी सोहळ्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत बसची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यातील विविध भागातील विद्यार्थी या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार असल्यामुळे त्यांना नाशिक शहरातून विद्यापीठात येण्यासाठी विद्यापीठातर्फे मोफत एस. टी. बसची व्यवस्था केली आहे. दुपारी १२ वाजेपासून रात्री ८ वाजेपर्यंत बसची सुविधा मिळणार आहे. सदर बससेवा ही सीबीएसपासून अशोकस्तंभ, गंगापूरोड मार्गे मुक्त विद्यापीठ अशी आहे. या पदवी प्रदान सोहळ्याचे थेट प्रसारण इंटरनेटवरूनही करण्यात येणार आहे. वायसीएमयू डॉट डिजिटल युनिव्हर्सिटी डॉट एसी या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध असणार आहे. पत्रकार परिषदेस कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, परीक्षा नियंत्रक डॉ. अर्जुन घाटुळे, वित्त अधिकारी मगन पाटील हेही उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Today's Convocation Function of 'Free'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.