सटाणा, नामपूर बाजार समितीची आज मतमोजणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 01:20 AM2018-05-31T01:20:51+5:302018-05-31T01:20:51+5:30
सर्वांचे लक्ष लागून असलेल्या सटाणा, नामपूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची गुरुवारी (दि. ३१) मतमोजणी होणार आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. दोन्ही बाजार समितीच्या ७४ उमेदवारांचे नशीब मंगळवारी मतपेटीत बंद झाले असून, आजच्या निकालाकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
सटाणा : सर्वांचे लक्ष लागून असलेल्या सटाणा, नामपूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची गुरुवारी (दि. ३१) मतमोजणी होणार आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. दोन्ही बाजार समितीच्या ७४ उमेदवारांचे नशीब मंगळवारी मतपेटीत बंद झाले असून, आजच्या निकालाकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
बागलाण तालुक्यातील सटाणा बाजार समितीच्या १४ तर नामपूर बाजार समितीच्या १३ जागांसाठी गेल्या मंगळवारी मतदान झाले. सभापतिपदावर डोळा ठेवून या निवडणुकीत अनेक उमेदवारांनी उडी घेतल्यामुळे अखेरच्या टप्प्यात चुरस निर्माण झाली होती. यामुळे संपूर्ण तालुक्याचे लक्ष या निवडणूक निकालाकडे लागून आहे. या निवडणुकीत आमदार दीपिका चव्हाण, संजय चव्हाण, माजी आमदार दिलीप बोरसे, उमाजी बोरसे यांच्या समर्थकांनी आमनेसामने दंड थोपटल्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. या निवडणुकीच्या निकालाचे परिणाम आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीवर होणार आहेत. त्यामुळे आजीमाजी आमदारांसाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. सटाणा बाजार समितीची मतमोजणी सकाळी १० वाजेपासून येथील प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या मजल्यावर तर नामपूरची मतमोजणी बाजार समितीच्या मुख्य कार्यालयाच्या आवारातील ईशान्य बाजूकडील दुसऱ्या क्र मांकाच्या गुदामात करण्यात येणार आहे. सटाणा बाजार समितीच्या आडते, हमाल मतदारसंघ व हमाल, मापारी मतदारसंघासाठी एक टेबल व शेतकरी मतदारसंघातील १० गणांसाठी १० टेबल अशा ११ टेबलवर एकाच वेळी मतमोजणी सुरू होईल. नामपूरच्या हमाल, मापारी मतदारसंघ व शेतकरी मतदारसंघातील १२ गणांच्या मतमोजणीसाठी एकूण १३ टेबल ठेवण्यात आले असून, एकाच वेळी मतमोजणी करण्यात येणार आहे. या मतमोजणीस उमेदवार व उमेदवाराने रीतसर नेमलेला एक प्रतिनिधी कक्षात उपस्थित राहू शकतो. निवडणूक निर्णय अधिकाºयांनी दिलेले ओळखपत्र मतमोजणीसाठी आणणे बंधनकारक राहणार आहे. सर्व निकाल दुपारी साडेतीन वाजेपर्यंत लागणे अपेक्षित असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाºयांनी सांगितले.