कांदा अनुदान अर्जाची आज शेवटची मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 05:32 PM2019-02-14T17:32:37+5:302019-02-14T17:32:53+5:30
नांदगांव नांदगांव कृषी उत्पन्न बाजार समितीचे नांदगांव व बोलठाण यार्डवर दि. १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत कांदा विक्र ी केलेल्या शेतकऱ्यांनी अनुदानासाठी शुक्र वारी (दि.१५) अंतिम मुदत असल्याने या दिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन बाजार समिती सभापती तेज कवडे यांनी केले आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगांव चे नांदगांव व बोलठाण यार्डवर दि. १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत कांदा विक्र ी केलेल्या शेतकºयांसाठी प्रति क्विंटल २०० रूपये या प्रमाणे कांदा अनुदान जाहिर केलेले आहे. या करिता कांदा अनुदान मागणी अर्ज करणेचा दि. १५ फेब्रुवारी शेवटचा दिवस असून या दिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंत सदर अर्ज नांदगांव व बोलठाण येथील कार्यालयात स्विकारले जाणार आहेत. अनुदान मिळविणेसाठी अर्ज कार्यालयात निशुल्क उपलब्ध असून सदर अर्जा सोबत कांदा विक्र ीच्या हिशोब पावत्या, स्वताच्या नावाचा ७/१२ उतारा, त्यावर कांदा पिकपेरा असलेली नोंद, आधार कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स, मोबाईल क्र मांक आदि कागदपत्रे जमा करावयाची आहे.
शुक्र वारी (दि. १५ फेब्रूवारी पर्यंत कांदा अनुदान मागणी अर्जासह बाजार समितीचे नांदगांव, बोलठाण येथील कार्यालयात सादर करावेत. कांदा विक्र ी केलेल्या शेतकºयाच्या नावावर ७/१२ उतारा नसेल तर त्यांनी त्यांचे कुटुंबातील व्यक्तीच्या उदा. आई, वडील, भाऊ, बहिण, आजोबा इत्यादी नावाने असलेल्या ७/१२ उतारा व उतारा धारक व्यक्तीचे बँक पासबुक झेरॉक्स व कांदा विक्र ी केलेल्या शेतकºयाचे संमतीपत्र अर्जा सोबत जोडणे आवश्यक आहे. सदर अनुदान हे बँक खात्यावर सदर रक्कम जमा होणार आहे.
शेतकरी बांधवांनी मुदतीत कांदा अनुदानासाठी अर्ज सादर करावेत असे आवाहन सभापती कवडे, संचालक मंडळ, सचिव अमोल खैरनार यांनी केले आहे.