नियमबाह्य शुल्कप्रकरणात आज निर्णय, पालकांचे न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:17 AM2021-03-01T04:17:20+5:302021-03-01T04:17:20+5:30
कोरोना काळात आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा आधार घेत सरकारने ८ मे २०२० रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शुल्क वाढ करू नये व ...
कोरोना काळात आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा आधार घेत सरकारने ८ मे २०२० रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शुल्क वाढ करू नये व ती टप्प्याटप्प्याने घ्यावी, असे आदेश खासगी शाळांना दिले होते. या निर्णयाला आक्षेप घेत काही संस्थांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, मुख्य न्यायमूर्ती दीपाशंकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर त्यांची सुनावणी सुरू होती. या प्रकरणात २६ जून २०२० पासून २५ वेळा याबाबत सुनावणी झाली असून, अंतिम सुनावणीही पूर्ण झाली आहे. आता या प्रकरणात सोमवारी अंतिम आदेश येणे अपेक्षित असून, पालकांना होणारा त्रास यामुळे उच्च न्यायालय पालकांच्या बाजूने सकारात्मक निकाल देईल, अशी आशा नाशिक पॅरेंटस असोसिएशनचे अध्यक्ष नीलेश साळुंखे यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, शाळांच्या शुल्काबाबतचे प्रश्न न्यायालयात प्रलंबित असताना विद्यार्थ्यांवर शुल्क वसुलीसाठी तगादा लावू नये. तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल, अशी कोणतीही कारवाई करू नये, अशी मागणी नाशिक पॅरेंटस असोसिएशनच्या माध्यमातून करण्यात आली आहे.