चणकापूर, हरणबारीच्या पाण्याचा आज फैसला

By admin | Published: November 30, 2015 11:45 PM2015-11-30T23:45:04+5:302015-11-30T23:45:48+5:30

बैठक : पाणी देण्यास पाटबंधारे अनुत्सुक

Today's decision on water from Chankapur, Harnabari | चणकापूर, हरणबारीच्या पाण्याचा आज फैसला

चणकापूर, हरणबारीच्या पाण्याचा आज फैसला

Next

नाशिक : समन्यायी पाणीवाटप कायद्याच्या आधारे जळगाव शहरासाठी चणकापूर, हरणबारीसह चार धरणांतून गिरणा धरणात पाणी सोडण्याच्या प्रश्नावर महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची मंगळवारी मुंबईत बैठक होत असून, या धरणांमधून पाणी सोडण्यास कसमादेच्या लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांनी यापूर्वीच केलेला विरोध तसेच गंगापूर व दारणा धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडल्यानंतर जिल्ह्णात सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते तसेच शेतकऱ्यांचा उठलेला क्षोभ लक्षात घेता खुद्द पाटबंधारे खातेच जळगावसाठी पाणी सोडण्यास अनुत्सुक असल्याचे वृत्त आहे.
चणकापूर, हरणबारी, केळझर व पूनद या चार धरणांमधून गिरणा धरणात व तेथून जळगाव जिल्ह्णासाठी समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार पाणी सोडण्याबाबत मुंबईत प्राधिकरणाची बैठक होत आहे. या चारही धरणांमध्ये ४८९८ दशलक्ष घनफूट पाण्याचे यापूर्वीच नियोजन करण्यात आले आहे.
या चारही धरणांपैकी चणकापूरमधून मालेगाव शहर, सटाणा, रावळगाव, दाभाडी पाणीपुरवठा योजना तसेच केळझर धरणातूनही सटाणा नगरपालिका, पिंपळगाव, निकवेल पाणीपुरवठा योजनेसाठी पाणी सोडावे लागले. हरणबारी धरणातून मोसम नदीकाठावरील सर्व गावे तसेच पाणी योजना अवलंबून असून, पूनद धरण देवळा, कळवण, सटाणा, मालेगाव या चार तालुक्यांसाठी पाण्याची तहान भागवते.
या धरणाची क्षमता व त्यात सध्या असलेला पाणीसाठा तसेच मागणी पाहता, धररातून बिगर सिंचनासाठी पाणी देणे तूर्त शक्य दिसत नाही. या उपर गिरणा धरणात १८३५ दशलक्ष धनफूट पाणी सध्या उपलब्ध असून, जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने या धरणाच्या पाण्यावर नाशिक जिल्ह्णातील नांदगाव, मालेगाव येथील पाण्याचे आरक्षण अद्याप मंजूर केलेले नाही. अशा परिस्थितीत समन्यायी पाणीवाटप कायद्यान्वये गिरणा पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या चणकापूर, हरणबारी, केळझर व पूनद या चार धरणांतील पाणी जळगाव जिल्ह्णासाठी सोडण्याबाबत जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची बैठक होत आहे. या बैठकीसाठी जिल्हाधिकारी, संबंधित तालुक्याचे लोकप्रतिनिधी, पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनाही पाचारण करण्यात आलेले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Today's decision on water from Chankapur, Harnabari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.