आज वाजणार शाळेची पहिली घंटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 01:00 AM2018-06-15T01:00:40+5:302018-06-15T01:00:40+5:30
नाशिक : शालेय सुट्या संपून जून महिन्यात नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होत असून, शुक्रवारी (दि. १५) सकाळी शाळेची पहिली घंटा वाजणार आहे. नवीन शैक्षणिक वर्षातील पहिल्या दिवसाची विद्यार्थी आणि पालकांनादेखील उत्सुकता आहे. नवीन गणवेश, नवी कोरी पुस्तके, नवे मित्र-मैत्रिणी आणि जुन्या मित्रांची भेट अशा उत्सुकतेच्या वातावरणात पुन्हा एकदा शाळेच्या परिसरात किलबिलाट होणार असून, सुमारे दीड हजार चिमुकले शाळेत पहिले पाऊल ठेवणार आहे.

नवीन शैक्षणिक वर्षाला शुक्रवारपासून प्रारंभ होणार असून, शासनाच्या परिपत्रकानुसार जिल्ह्यातील सर्वच शाळा शुक्रवारी सुरू होणार आहेत. शाळेचा पहिला दिवस हा विद्यार्थ्यांच्या स्वागताचा असल्याने शाळेत प्रथम पाऊल ठेवणाºया चिमुकल्याचे स्वागत केले जाणार आहे. ग्रामीण भागात चिमुकल्यांच्या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे तर शहरात अनेक शाळांनी नावीन्यपूर्ण कल्पना राबवून मुलांच्या स्वागताची तयारी केली आहे.
शाळा सुरू होण्याच्या एक दिवस अगोदरच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाºयांनी शाळेचे रंगरूप पालटले आहे. असंख्य शाळा नव्या रंगात रंगल्या आहेत तर शाळांचा परिसर आणि वर्गखोल्या फुलांनी तसेच चित्रांनी सजविण्यात आलेल्या आहेत. सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळेच्या पहिल्या दिवशी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तकांचे वाटप केले जाणार आहे. यासाठीची सर्व तयारी शाळांनी केली असून पुस्तक वाटपाच्या कार्यक्रमाचीदेखील आखणी केलेली आहे. शहरातील अनुदानित, विनाअनुदानित तसेच मान्यताप्राप्त शाळा १५ तारखेला सुरू होणार आहेत. शहारातील महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्ताकांचे वाटप केले जाणार आहे.समायोजनामुळे गजबजणार शाळायंदा अनेक शाळांचे समायोजन करण्यात आल्याने शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढणार असून, पुरेशी शिक्षकसंख्यादेखील असल्याने विद्यार्थ्यांची सोय होणार असल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे. कमी पटसंख्या असलेल्या शाळा यंदा बंद करून जवळच्या शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे. शहर आणि जिल्ह्यात एकूण सुमारे ७५ शाळांचे समायोजन करण्यात आल्याने ओस पडलेल्या शाळा गजबजणार आहेत.
92
महापालिकेच्या शाळा
89
शहरातील अनुदानित
92
शहरातील विनाअनुदानित
1200
माध्यमिक शाळा प्राथमिक शाळा
3331