आजची महासभा रद्द; स्थायीचा मात्र अखेरचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 12:25 AM2020-02-29T00:25:26+5:302020-02-29T00:26:25+5:30
शहर विकास आराखड्यातील आरक्षित भूखंडांच्या भूसंपादनावरून सुरू असलेल्या वादात शासनाने अंतरिम स्थगिती दिल्याने शनिवारी (दि.२९) महापौर सतीश कुलकर्णी यांनी बोलविलेली महासभा रद्द करण्यात आली आहे. स्थायी समितीने मात्र आठ सदस्यांच्या मुदत संपण्याच्या अखेरच्या दिवशीही सकाळी ८ वाजता बैठक बोलवली आहे. त्यात अनेक विषय मंजूर होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे भूसंपादन प्रकरणांबाबतदेखील निर्णय होण्याची शक्यता आहे.
नाशिक : शहर विकास आराखड्यातील आरक्षित भूखंडांच्या भूसंपादनावरून सुरू असलेल्या वादात शासनाने अंतरिम स्थगिती दिल्याने शनिवारी (दि.२९) महापौर सतीश कुलकर्णी यांनी बोलविलेली महासभा रद्द करण्यात आली आहे. स्थायी समितीने मात्र आठ सदस्यांच्या मुदत संपण्याच्या अखेरच्या दिवशीही सकाळी ८ वाजता बैठक बोलवली आहे. त्यात अनेक विषय मंजूर होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे भूसंपादन प्रकरणांबाबतदेखील निर्णय होण्याची शक्यता आहे.
शहरातील आरक्षित भूखंडांचे भूसंपादन करण्यासाठी प्रशासनाने समिती गठित केली होती. त्यानुसार प्राधान्यक्रम ठरविण्यात आला असून, २८ प्रकरणात १५७ कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव आहे. धोरण ठरविण्याचा अधिकार महासभेचा असल्याने यापुढे भूसंपादनाचे प्रस्ताव महासभेतच मांडावे, असे आदेश प्रशासनाला देण्यात आले होते. त्यानंतर प्रशासनातील अधिकारी स्थायीवर प्रस्ताव मांडण्याच्या तयारीत असल्याने शनिवारी तातडीची महासभा बोलविण्यात आली होती. मात्र, राज्य शासनाने निर्णय घेण्यास स्थगिती दिल्याने महापौरांनी महासभा रद्द केली आहे.
आज निरोपाची सभा
स्थायी समिती मात्र अजूनही प्रशासन प्रस्ताव सादर करेल या प्रतीक्षेत आहे. समितीची अखेरची सभा शनिवारी (दि.२९) सकाळी ९ वाजताच होणार आहे. विशेष म्हणजे महापालिकेला सुटी असतानाही ही सभा होणार आहे.