आज अधिकमासाची समाप्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 01:17 AM2018-06-13T01:17:52+5:302018-06-13T01:17:52+5:30
अधिकमास अर्थात धोंड्याच्या महिन्याची बुधवारी (दि.१३) समाप्ती होत असून, त्यामुळे मंगळवारपासूनच अखेरचा पर्व साधण्यासाठी रामकुंड, गोदाकाठ आदी ठिकाणी तीर्थस्नान, देवदर्शनासाठी गर्दी उसळलेली पहायला मिळत आहे.
नाशिक : अधिकमास अर्थात धोंड्याच्या महिन्याची बुधवारी (दि.१३) समाप्ती होत असून, त्यामुळे मंगळवारपासूनच अखेरचा पर्व साधण्यासाठी रामकुंड, गोदाकाठ आदी ठिकाणी तीर्थस्नान, देवदर्शनासाठी गर्दी उसळलेली पहायला मिळत आहे. पाण्याचे आवर्तन सोडल्याने सध्या गंगेला भरपूर पाणी असून भाविकांनी रामकुंडासह विविध ठिकाणी गंगास्नानाचा आनंद घेतला. बुधवारी (दि.१३)ला दिवसभर अमावास्या असून, अधिकमासाची समाप्ती होत आहे. या दिवशी संपूर्ण दिवसभर गंगास्नान, गंगेला दिवा अर्पण करणे, देवदर्शन करणे, देवाला अधिकाचे वाण देणे आदी केलेले चालणार आहे. ज्यांना संपूर्ण अधिकमासात भाचा, लेक-जावई यांना अधिकाचे दान द्यायला जमले नाही ते बुधवारी ही पर्वणी साधू शकतील. याशिवाय मातृपूजनालाही मोठे महत्त्व आहे. त्यावरही लेकी-सुनांनी भर द्यायला हरकत नाही, अशी माहिती पुरोहितवर्गाकडून सांगण्यात येत आहे. बुधवारपासून (दि.१६ मे) अधिकमास सुरू झाला होता. दरम्यान, अमावस्या आणि अधिकमासाची सांगता असल्याने राज्यभरातून भाविकांनी तीर्थक्षेत्री गर्दी केलेली पहायला मिळत आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन प्रशासनानेही नियोजन केले आहे.