आज घरोघरी लक्ष्मीपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 12:48 AM2017-10-19T00:48:47+5:302017-10-19T00:49:08+5:30
दीपोत्सव : व्यापारीवर्गाच्या नववर्षास सुरुवात; बाजारात खरेदीचा उत्साह नाशिक : अंधारातून प्रकाशाकडे नेणाºया दिवाळीतील प्रत्येक सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुरुवारी (दि. १९) दीपावलीतील महत्त्वाचा लक्ष्मीपूजनाचा दिवस असून, बुधवारी शहरातील बाजारपेठेत पूजा साहित्य खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
सुख-समृद्धीची उधळण करीत हर्षोल्हास घेऊन आलेल्या दीपपर्वाने सर्वत्र आनंदाची बरसात होत असून, आकाशदीपांच्या रंगलहरींनी आंगण उजळून निघाले आहे. लक्ष्मीच्या स्वागतासाठी लक्ष, लक्ष दीपांच्या लखलखत्या प्रकाशाने दीपोत्सव तेजोमय करणाºया या सुवासिनी.
दीपोत्सव : व्यापारीवर्गाच्या नववर्षास सुरुवात; बाजारात खरेदीचा उत्साह
नाशिक : अंधारातून प्रकाशाकडे नेणाºया दिवाळीतील प्रत्येक सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुरुवारी (दि. १९) दीपावलीतील महत्त्वाचा लक्ष्मीपूजनाचा दिवस असून, बुधवारी शहरातील बाजारपेठेत पूजा साहित्य खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
लक्ष्मीपूजनाच्या पूजेसाठी लागणारी केरसुणी, साळीच्या लाह्या, झेंडूची फुले, पाच प्रकारची फळे, ऊस, विड्याची पाने, मातीच्या लक्ष्मीची मूर्ती, लक्ष्मीचे फोटो आदी वस्तूंची खरेदी करण्यासाठी महिलावर्गाची बाजारपेठेत गर्दी झाली होती. महालक्ष्मीला आवडणारी कमळाची फुलेदेखील पंचवटीतील फूल बाजार तसेच रविवार कारंजा परिसरात विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाºयांना आपल्या संस्थांकडून महागाई भत्ता, सानुग्रह अनुदान भरघोस प्रमाणात मिळाल्याने कामगारवर्गाने नवीन वस्तू खरेदी करण्यास प्राधान्य दिले. रेडिमेड कपड्यांसह साड्यांची दुकाने तसेच मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रीच्या दुकानांमध्ये चोखंदळ ग्राहक वस्तू खरेदी करताना दिसत होते.
व्यापारीवर्गाचे लक्ष्मीपूजनापासून नवीन वर्ष सुरू होत असल्याने रोजमेळ, खतावणी, चोपड्या, रोजकीर्दमध्ये व्यापारी नोंदी करण्यास सुरुवात करणार आहेत. लक्ष्मीपूजनाला पहाटे लवक र उठून अभ्यंगस्नान करण्यात येते आणि लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्ताची योग्य वेळ साधून पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन करण्यात येणार आहे. दिवाळीच्या दिवशी यश, कीर्ती आणि धनलाभाची कामना करत महालक्ष्मीची पूजा करण्यात येते. लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मीसोबतच भगवान गणेश, विष्णू आणि कुबेराची पूजा करण्याचा प्रघात आहे. गुरुवारी (दि. १९) लक्ष्मीपूजन झाल्यानंतर शुक्रवारी (दि.२०) बलिप्रतिपदा आणि शनिवारी (दि. २१) भाऊबीज साजरी केली जाणार आहे.
लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व असल्याने यावेळी सोने, चांदी आणि मोत्यांचे दागिने, चांदी तसेच सोन्याची नाणी, रोख पैसे आदींची पूजा करण्यात येते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झेंडू, शेवंतीच्या फुलांचे तोरण दरवाजावर लावण्यात येते.
आपल्या वाहनांनाही झेंडूच्या फुलांचा हार घालण्यात येतो. लक्ष्मीपूजनानंतर रात्री आकाशकंदील, पणत्या प्रज्वलित करून आसमंतात फटाक्यांची आतषबाजी करत लक्ष्मीपूजनाचा सण उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.लक्ष्मीपूजनासाठी मुहूर्तशुभ : सकाळी ६.३२ ते ७.५९
लाभ : दुपारी १२.२० ते ०१.४७
अमृत : दुपारी ०१.४७ ते ३.१४
शुभ : दुपारी ४.४१ ते सायंकाळी ६.०८
अमृत : सायंकाळी ६.०८ ते ७.४१