आज वसूबारस

By admin | Published: October 25, 2016 11:46 PM2016-10-25T23:46:39+5:302016-10-25T23:47:11+5:30

दिवाळीला सुरुवात : यंदा दोन दिवस गोवत्स पूजनाचा योग

Today's Newspaper | आज वसूबारस

आज वसूबारस

Next

नाशिक : आश्विन वद्य द्वादशीपासून कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत दिवाळी सण साजरा करण्यात येतो. आश्विन वद्य द्वादशी या दिवशी दिवाळीच्या सणाला सुरुवात होत असून, हा दिवस ‘गोवत्स द्वादशी’ अर्थात वसूबारस म्हणून साजरा केला जातो. यादिवशी पारंपरिक पद्धतीने गायीचे आणि वासराचे पूजन करण्यात येते. यावर्षी आश्विन वद्य एकादशी ही तिथी बुधवारी (दि. २६) आणि गुरुवारी (दि. २७) दुपारी २ वाजून ४० मि.पर्यंत असल्याने दोन दिवस गोवत्स पूजन केले जाणार आहे. गोवत्स पुजनासाठी सूर्यास्तानंतरची वेळ शुभ असल्याने बुधवारीच पारंपरिक गोवत्स पूजन केले जाणार आहे. घराघरात लक्ष्मीचे आगमन व्हावे यासाठीदेखील प्रसन्न वातावरणात पूजा करण्यात येते. शहराची वाढ झाल्यामुळे गोठे नामशेष होऊ लागले. शहरातील तिडके कॉलनी येथील गुरूगंगेश्वर वेदमंदिर आश्रम, तपोवन येथील कृषी गो-सेवा ट्रस्ट, दिंडोरी येथील नंदिनी गोशाळा या ठिकाणी बुधवारी (दि. २६) संध्याकाळी गोरज मुहूर्तावर, तर पंचवटी परिसरातील पांजरापोळ, बालाजी मंदिर, गंगापूर धबधब्याजवळील कै. मोरोपंत पिंगळे गोशाळेत गुरुवारी (दि. २७) सकाळी १०:३० वाजता गोवत्स पूजन केले जाणार असून, शहरातील नागरिकांसाठीदेखील पूजा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दिवाळीला याच दिवसापासून सुरुवात होत असल्याने बुधवारपासून मोठ्या आणि आकर्षक रांगोळ्या काढण्यासाठी महिलांमध्ये विशेष उत्साह आणि लगबग बघायला मिळते. वसूबारस या दिवशी बहुतेक स्त्रियांचा उपवास असतो. वसूबारसेच्या दिवशी गहू, मूग यांचे सेवन न करता बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी खाण्याची पौराणिक प्रथा आहे. गाय आणि वासरू यांच्या नात्यातून जो प्रेम आणि जिव्हाळा दिसून येतो त्याचप्रमाणे आपल्या मुलांना उत्तम आरोग्य आणि सुख मिळावे, अशी वसूबारस पूजेमागील अख्यायिका आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Today's Newspaper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.