जिल्ह्यातील ३७ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 01:50 AM2018-02-27T01:50:18+5:302018-02-27T01:50:18+5:30
जिल्ह्यातील ३७ ग्रामपंचायतींमध्ये मंगळवारी मतदान घेण्यात येणार असून, त्यासाठी सोमवारीच मतदान केंद्रांवर साहित्य रवाना करण्यात आले आहे. दरम्यान, निवडणूक होणाºया ग्रामपंचायतीच्या हद्दीत नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून जिल्हाधिकाºयांनी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे.
नाशिक : जिल्ह्यातील ३७ ग्रामपंचायतींमध्ये मंगळवारी मतदान घेण्यात येणार असून, त्यासाठी सोमवारीच मतदान केंद्रांवर साहित्य रवाना करण्यात आले आहे. दरम्यान, निवडणूक होणाºया ग्रामपंचायतीच्या हद्दीत नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून जिल्हाधिकाºयांनी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने जानेवारी महिन्यातच या निवडणुकांची घोषणा केली होती. मार्च ते मे यादरम्यान मुदत संपणाºया सर्व ग्रामपंचायती तसेच रिक्त जागा असलेल्या ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका घेण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार नाशिक जिल्ह्णातील पंधराही तालुक्यांत २८३ ग्रामपंचायतींतील ४९५ रिक्त जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. परंतु त्यातील बहुतांशी जागा अनुसूचित जमाती महिला वर्गाच्या असल्यामुळे व त्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नसल्यामुळे अनेक जागांवर नामांकनच दाखल करण्यात आले नाही. इगतपुरी तालुक्यातील टाकेद ग्रामपंचायतीसाठी फक्त तीन जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, तेथील सरपंचपद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव असल्यामुळे सरपंचपदासाठी नामांकन दाखल होऊ शकले नाही. त्यामुळे आता माघारीनंतर नऊ तालुक्यांतील ३७ ग्रामपंचायतींच्या ४६ प्रभागांतील ५१ जागांसाठी निवडणूक होणार आहे. मंगळवारी सकाळी सा डेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ५० मतदान केंद्रांवर मतदान होईल त्यासाठी २५० अधिकारी, कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बुधवारी मतमोजणी होणार आहे.