नाईक शिक्षण संस्थेसाठी आज मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 01:55 AM2019-07-20T01:55:47+5:302019-07-20T01:56:13+5:30
क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेचा पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारी (दि. २०) मतदान होत असून, संस्थेचे ८ हजार ६९४ सभासद या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहे.
नाशिक : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेचा पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारी (दि. २०) मतदान होत असून, संस्थेचे ८ हजार ६९४ सभासद या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहे. निवडणूक मंडळाकडून निवडणुकीची संपूर्ण तयारी झाली असून, नाईक महाविद्यालयातील तीन इमारतींमधील ३९ बुथवर ४०० मतदान कर्मचारी व १०० मदतनिसांच्या माध्यमातून ही मतदानप्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती निवडणूक मंडळाचे अध्यक्ष अॅड. गजेंद्र सानप यांनी दिली.
नाईक संस्थेच्या ज्येष्ठ विश्वस्त मंडळ, पदाधिकारी व कार्यकारी मंडळाचे सदस्य अशा एकूण २९ जागांसाठी कॅनडा कॉर्नरवरील नाशिक मुख्यालयात मतदान होणार असून, रविवारी (दि. २१) गंगापूररोडवरील चोपडा हॉल येथे मतमोजणी होणार आहे. संस्थेचे एकूण ८ हजार ६९४ सभासद मतदानाचा हक्क बजावणार आहे. मतदानासाठी ३९ बुथवर ४०० कर्मचारी काम करणार असून, त्यांना १०० मदतनीस राहणार आहे. प्रत्येक बुथवर प्रत्येकी दहा कर्मचारी बुथवर काम करणार आहेत. दहा अधिकारी व १०० पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
संस्था मुख्यालयाच्या आवारात सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदानप्रक्रिया राबविली जाईल. विश्वस्त गटासाठी सहा उमेदवारांना मतदान करता येईल. नाशिक गटात चार उमेदवार निवडून देण्याचा अधिकार असेल, सिन्नर गटात तीन, निफाड-चांदवड गटात तीन, येवला-मालेगाव गटात दोन, नांदगाव, बागलाण व कळवण गटात दोन उमेदवारांना मतदान करता येईल. २९ उमेदवार निवडण्यासाठी
८ हजार ६९४ सभासद हक्क बजावतील.