स्थायी समितीच्या सभेत आज मुकणेचा प्रस्ताव
By admin | Published: December 14, 2015 10:25 PM2015-12-14T22:25:22+5:302015-12-14T22:34:51+5:30
नाशिक : बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित मुकणे पाणीपुरवठा योजनेचा सुमारे २६६ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव मंजुरीसाठी मंगळवारी (दि.१५) होणार्या स्थायी समितीच्या सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असून, सदर प्रस्तावाला विनाचर्चा मान्यता मिळण्याची शक्यता आहे.

महासभेने दीर्घ कालावधीनंतर मुकणे पाणीपुरवठा योजनेला मान्यता दिली. या योजनेतील वाढीव खर्चालाही मान्यता दिल्यानंतर सदरचा प्रस्ताव आता करारनाम्यासाठी स्थायीवर मंजुरीला ठेवण्यात आला आहे. सदरचा प्रस्ताव ठेवताना त्याची प्रत अभ्यासासाठी मिळाली नसल्याचे प्रा. कुणाल वाघ यांनी सांगितले. दरम्यान, मुकणेप्रश्नी स्थायीची भूमिका पाहता त्याला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. स्थायीवर घंटागाडीच्या ठेक्यालाही चार महिन्यांसाठी मुदतवाढीचा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.