‘त्या’ जागेसाठी आज फेरमतमोजणी

By Admin | Published: April 7, 2017 02:11 AM2017-04-07T02:11:49+5:302017-04-07T02:12:07+5:30

नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणुकीत बी. जी. वाघ यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे फेरमतमोजणीसाठी अर्ज दाखल केला आहे

Today's rehearsals for 'that' place | ‘त्या’ जागेसाठी आज फेरमतमोजणी

‘त्या’ जागेसाठी आज फेरमतमोजणी

googlenewsNext

नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणुकीत ग्रंथमित्र पॅनलचे उमेदवार बी. जी. वाघ आणि जनस्थान पॅनलचे उमेदवार धनंजय बेळे यांच्यात अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत जनस्थान पॅनलचे उमेदवार धनंजय बेळे यांनी वाघ यांचा अवघ्या एका मताने पराभव केल्यानंतर बी. जी. वाघ यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे फेरमतमोजणीसाठी अर्ज दाखल केला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना प्राप्त झालेल्या अर्जानुसार शुक्रवारी (दि. ७) सकाळी ११.३० वाजता फेरमतमोजणी प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी माधवराव भणगे यांनी दिली.
शुक्रवारी वाचनालयाच्या मिटिंग हॉलमध्ये दोन्ही उमेदवार आणि पॅनलचे प्रत्येकी दोन प्रतिनिधी आणि चार ते पाच निवडणूक कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत फेरमतमोजणी करण्यात येणार आहे. दरम्यान फेरमतमोजणीच्या पूर्वसंध्येला सार्वजनिक वाचनालयाचा परिसर पुन्हा उमेदवारांच्या चर्चा आणि किरकोळ वादाने गजबजला. जनस्थान पॅनलचे एकमेव विजयी उमेदवार धनंजय बेळे यांनी फेरमतमोजणी प्रक्रियेविषयी आक्षेप घेत ही फेरमतमोजणी प्रक्रिया चुकीची असल्याचे पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले. बेळे यांनी सादर केलेल्या या अर्जामुळे ही निवडणूक प्रक्रिया पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
भालचंद्र वाघ आणि धनंजय बेळे यांनी कार्यकारिणी मंडळ सदस्य पदासाठी निवडणूक लढविली होती. त्यामुळे कार्यकारिणी मंडळ सदस्य पदासाठी तयार करण्यात आलेल्या मतपत्रिकांची फेरमतमोजणी होणार आहे. फेरमतमोजणीसाठी अर्ज दाखल केलेले ग्रंथमित्र पॅनलचे उमेदवार भालचंद्र वाघ आणि जनस्थान पॅनलचे उमेदवार धनंजय बेळे यांना शुक्रवारी होणाऱ्या फेरमतमोजणी प्रक्रियेसाठी उपस्थित राहण्याचे पत्र देण्यात आले होते, परंतु जनस्थान पॅनलचे उमेदवार धनंजय बेळे यांनी फेरमतमोजणीसाठी उपस्थित राहण्याचे पत्र स्वीकारण्यास नकार दिला आणि गुरुवारी संध्याकाळी फेरमतमोजणी प्रक्रिया चुकीची असल्याचा अर्ज निवडणूक अधिकायांकडे सुपूर्द केला.
फेरमतमोजणी प्रक्रियेसाठी अर्ज दाखल केल्यानंतर ग्रंथमित्र पॅनलचे उमेदवार भालचंद्र वाघ यांना पाच हजार रुपये शुल्क भरावे लागणार असून, यासाठी वाघ यांना शुक्रवारी सकाळी ११ वाजेपर्यंतची मुदत दिली आहे. धनंजय बेळे यांनी फेरमतमोजणी करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा अर्ज दाखल केला नसला तरी त्यांना या प्रक्रियेत सहभागी व्हावे लागणार आहे, अशी माहिती भणगे यांनी दिली. शुक्रवारी (दि. ७) सकाळी ११ वाजेपर्यंत फेरमतमोजणीसाठी अर्ज करणारे उमेदवार भालचंद्र वाघ यांनी फेरमतमोजणीसाठी निर्धारित केलेले शुल्क अदा केले नाही, तर फेरमतमोजणीची प्रक्रिया आपोआप रद्द होईल आणि पूर्वीचाच निकाल ग्राह्य धरण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी रविवारी (दि. २) मतदान घेण्यात आले आणि सोमवारी या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला.
सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या निकालानंतर १८ पैकी १७ जागांवर ग्रंथमित्र पॅनलने निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले होते. या निवडणुक ीत जनस्थान पॅनलचे एकमेव उमेदवार धनंजय बेळे हे विजयी झाले. बेळे यांना या निवडणुकीत ८९५ तर वाघ यांना ८९४ मते मिळाली आहेत. भालचंद्र वाघ यांनी या निकालाला आव्हान दिल्याने फेरमतमोजणीनंतर वाघ विजयी होतात की बेळेंचा निकाल कायम राहतो, हे बघणे औत्सुक्याचे ठरले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Today's rehearsals for 'that' place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.