अभियांत्रिकीची आज तात्पुरती गुणवत्ता यादी
By admin | Published: July 10, 2017 12:39 AM2017-07-10T00:39:07+5:302017-07-10T00:39:21+5:30
नाशिक : अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेअंतर्गत सोमवारी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेअंतर्गत सोमवारी (दि. १०) दुसऱ्या कॅपराउंडसाठी तात्पुरती (प्रोव्हिजनल) गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. या यादीनुसार पहिल्या फेरीनंतर उर्वरित राहिलेल्या विद्यार्थ्यांना ११ ते १४ जुलै या कालावधीत संधी मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.
अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पहिला कॅपराउंड झाल्यानंतर रिक्त जागांसाठी दुसऱ्या कॅपराउंड अंतर्गत प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. दुसऱ्या राउंडसाठी सोमवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत यादी जाहीर होणार असून, विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर ही यादी पाहायला मिळेल. नाशिक विभागात अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी १७ हजार ७८८ जागा उपलब्ध असून, त्यापैकी दहा हजार ६१८ जागांवर पहिल्याच फेरीत प्रवेश निश्चित झाले असून, उर्वरित प्रवेशासाठी दुसऱ्या कॅपराउंडची प्रक्रिया सुरू आहे. विभागातील ५९ अभियांत्रिकी महाविद्यालयांत १७ हजार ७८८ जागांसाठी १९ हजार १९६ विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले असून, यातून पहिल्या कॅपराउंडसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया मंगळवारपर्यंत पूर्ण झाल्यानंतर आता संपूर्ण नाशिक विभागात सात हजार १७० जागा शिल्लक आहे. या उर्वरित जागांवर प्रवेशासाठी सोमवारी तात्पुरती यादी जाही झाल्यानंतर ११ ते १४ जुलै या कालावधित दुसऱ्या कॅ पराउंडअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना एआरसी सेंटरवर जाऊन त्यांचे प्रवेश निश्चित करावे लागणार आहे.