इगतपुरी-त्र्यंबकसाठी आज मतदान; प्रशासकीय यंत्रणा सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 12:39 AM2017-12-10T00:39:11+5:302017-12-10T00:43:13+5:30
इगतपुरी/त्र्यंबकेश्वर : येथील दोन्ही पालिकांसाठी रविवारी (दि. १०) मतदान होत असून, त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. थेट नगराध्यक्षपदाच्या निवडीमुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. मतमोजणी सोमवारी, दि. ११ रोजी होईल.

शनिवारी सायंकाळी निवडणूक प्रशासनाकडून मतदानाच्या तयारीबाबत माहिती देण्यात आली. गेल्या काही दिवसांतील पक्षीय परिस्थिती पाहता अनेकांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.
इगतपुरी नगरपालिकेच्या नऊ प्रभागांतून प्रत्येकी दोन असे एकूण १८ नगरसेवक निवडून द्यावयाचे आहेत. यासाठी एकूण ७९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. थेट नगराध्यक्ष पदासाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. नऊ प्रभागातील एकूण ३२ मतदान केंद्रांवर मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील.
त्र्यंबक पालिकेकरिता नगराध्यक्षपदासाठी ७ तर नगरसेवक पदासाठी ५४ उमेदवार रिंगणात आपले नशिब आजमावित आहेत. आठ प्रभागांसाठी १६ मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत. निवडणुकीसाठी ईव्हीएम यंत्र सर्व ठिकाणी तयार असून ऐनवेळी तांत्रिक बिघाड झाल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून निवडणूक शाखेने अतिरिक्त १६ इव्हिएम यंत्रे ठेवली आहेत.
इगतपुरी नगरपालिका
18 नगरसेवक पदे, 79 रिंगणातील उमेदवार
त्र्यंबकेश्वर नगरपालिका
17 नगरसेवकपदे, 56 रिंगणातील उमेदवार.