शौचालय-घरकुलांच्या धनादेशाचे वाटप
By admin | Published: February 19, 2016 11:43 PM2016-02-19T23:43:49+5:302016-02-19T23:44:08+5:30
शौचालय-घरकुलांच्या धनादेशाचे वाटप
नाशिक : इंदिरा आवास घरकुल योजना व हगणदारीमुक्त गाव अभियानाच्या योजनांमधील पात्र लाभार्थींना सोमवारी (दि.१५) विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी आयुक्तांनी काही कामांची पाहणीही केली.
दिंडोरी तालुक्यातील जानोरी आंबे व आंबेदिंडोरी या दोन गावांना सोमवारी विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी भेटी दिल्या. त्यावेळी जानोरी आंबे येथील इंदिरा आवास घरकुल योजनेत पात्र असलेल्या व हगणदारीमुक्त गाव अभियानाच्या २० बेघर लाभार्थ्यांना त्या त्या योजनांच्या रक्कमेचे धनादेश वाटप करण्यात आले. तसेच आंबे दिंडोरी येथील भूमिगत गटार योजनेची पाहणी यावेळी आयुक्त एकनाथ डवले यांनी करून त्याबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (स्वच्छता) प्रतिभा संगमनेरे, प्रांत मुकेश भोगे, तहसीलदार मंदार कुलकर्णी, गटविकास अधिकारी राहुल रोकडे, शिवसेना गटनेते प्रवीण जाधव व स्थानिक ग्रामपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)