‘टॉयलेट एक प्रेमकथा’ : लोकप्रतिनिधींनी फिरविली पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 11:53 PM2017-08-24T23:53:16+5:302017-08-25T00:02:55+5:30
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाकडून जिल्हा हगणदारीमुक्तीसाठी असलेले उद्दिष्ट साध्य होत नसल्याने, शौचालय उभारणीवरील सामाजिक चित्रपट अर्थात अभिनेता अक्षयकुमारचा ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ चित्रपटाचा आधार घेतला. मात्र, टॉयलेटची प्रेमकथा हा चित्रपट बघण्याकडे पदाधिकाºयांसह सदस्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र होते. हातावर मोजण्याइतक्या सदस्यांनी हजेरी लावली.
नाशिक : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाकडून जिल्हा हगणदारीमुक्तीसाठी असलेले उद्दिष्ट साध्य होत नसल्याने, शौचालय उभारणीवरील सामाजिक चित्रपट अर्थात अभिनेता अक्षयकुमारचा ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ चित्रपटाचा आधार घेतला. मात्र, टॉयलेटची प्रेमकथा हा चित्रपट बघण्याकडे पदाधिकाºयांसह सदस्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र होते. हातावर मोजण्याइतक्या सदस्यांनी हजेरी लावली.
चित्रपट दाखविण्यासाठी केलेला खर्च शौचालयासाठी दिला असता तर शौचालये उभारली असती, अशी बोचरी टीका शिवसेनेसह अन्य पक्षांच्या सदस्यांनी व्यक्त केली. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत जि.प. च्या पाणी व स्वच्छता कक्षाच्या वतीने जि.प. पदाधिकारी, सदस्य, खातेप्रमुख, गटविकास अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी टॉयलेट : एक प्रेमकथा या चित्रपटाचे उंटवाडी येथील सिनेमॅक्स सिनेमागृहात आज (दि.२४) आयोजन करण्यात आले होते. चित्रपटासाठी अध्यक्ष शीतल सांगळे, उपाध्यक्षा नयना गावित, समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर, शिक्षण व आरोग्य सभापती यतिन पगार, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे, राजेंद्र पाटील यांच्यासह सदस्य, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. ७३ सदस्यांची तिकिटे काढण्यात आली होती. परंतु, १० ते १२ सदस्यांनी केवळ चित्रपटासाठी हजेरी लावली.