शौचालय अनुदानाचे वाटप
By admin | Published: October 16, 2016 10:16 PM2016-10-16T22:16:53+5:302016-10-16T22:23:43+5:30
शौचालय अनुदानाचे वाटप
येवला : भारम येथे बांधकाम पूर्ण झालेल्या शौचालयाच्या धनादेशांचे वाटप जिल्हा परिषद सदस्य प्रविण गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हा परिषद मधुन मागील वर्षात एक कोटी २० लक्ष रु पयांचे अनुदान मिळवत तालुक्यात एक हजार ६२२ शौचालय पूर्ण केले आहेत.तर २०१६-१७ साठी एक कोटी ५० लक्ष मंजुर असून चार हजार ६४६ शौचालयांचे उदिष्ट पूर्ण केले जाणार आहे. शिवाय २३ गावे हागणदारीमुक्त केली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य प्रवीण गायकवाड यांनी दिली. भारम येथे बांधकाम पूर्ण झालेल्या शौचालयाच्या धनादेश वाटप आज करण्यात आले.
प्रत्येकाने घर- दार व घराचा परिसर स्वच्छ ठेवल्यास गाव आपोआप स्वच्छ होईल, असे मत विजय जेजुरकर यांनी व्यक्त केले.धनादेश वाटप प्रसंगी आसाराम जेजुरकर, गोपीनाथ जाधव, संजय देशमुख, तुकाराम पगारे, विजय जेजुरकर, योगेश व्यवहारे, आप्पा देशमुख, राम सातपुते,
रामनाथ देशमुख, मिराबाई
माळी, सिंधुबाई आहेर, मनिषा
आहिरे आदी उपस्थित होते. प्रशांत शिंदे यांनी सुत्रसंचालन केले ,तर ग्रामसेवक एस.जी.तळवाडे यांनी आभार मानले. (वार्ताहर)