आदिवासी कातकरी समाजाला शौचालये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 11:37 PM2020-10-06T23:37:38+5:302020-10-07T01:02:05+5:30
सर्वतिर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील टाकेद खुर्द ,अधरवड ,टाकेद बुद्रुक येथील कातकरी समाजाला शौचालये मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
सर्वतिर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील टाकेद खुर्द ,अधरवड ,टाकेद बुद्रुक येथील कातकरी समाजाला शौचालये मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे. कातकरी बांधवांच्या शिष्टमंडळाने टाकेद खुर्द येथे सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे यांच्याकडे समस्या मांडल्या होत्या. त्यातील शौचालय व पिण्याचे पाणी ह्या प्रमुख समस्या होत्या. लोहकरे यांनी टाकेद खुर्द बरोबरच अधरवड व टाकेद बुद्रुक येथील कातकरी वस्त्यांचेही नाविन्यपूर्ण योजनेत प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी यांचेकडे पाठवत मंजूरी घेतली होती. शौचालयाची गरज ,आवश्यकता व कातकरी बांधव योजनेपासून कसे वंचित आहेत ,आर्थिक परिस्थितीमुळे ते शौचालय बांधू शकत नाही हे सर्व जिल्हाधिकारी यांच्या निदशर्नास आणून दिले होते. त्या प्रश्नांची दखल घेऊन त्यास नाविन्यपूर्ण योजनेत तात्काळ मंजुरी देण्यात आली होती/ त्यामुळे कातकरी बांधवांची शौचालय समस्या सुटणार असून प्रत्येक्षात कामाला सुरुवात झाली आहे. टाकेद खुर्द ,टाकेद बुद्रुक येथे सद्य स्थितीत नवीन पाणी पुरवठा योजना प्रगतीपथावर आहेत. त्याच प्रमाणे अधरवड येथे कार्यान्वित आहे. पाणीपुरवठा विभागाचे संबंधित अधिकारी व ग्रामपंचायत प्रशासनास सूचना देऊन कातकरी वस्तीसाठी स्वतंत्र पाईपलाईन टाकून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुध्दा मार्गी लागणार आहे. ,शौचालय व पिण्याच्या पाण्याची अश्या दोनीही समस्या सुटणार आहेत.त्यामुळे कातकरी बांधवांबरोबरच टाकेद बुद्रुक ,अधरवड ,टाकेद खुर्द या ग्रामपंचायतच्या सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवकांनीही कातकरी वस्त्यांमधील प्रश्नांची सोडवणूक झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.