येस बॅँकेच्या शाखेत खडखडाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 10:28 PM2020-03-08T22:28:03+5:302020-03-08T22:28:42+5:30
कळवण : मानूर येथील येस बँकेच्या शाखेत खडखडाट झाला असून, तालुक्यातील खातेदारांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. शाखेत रोकड उपलब्ध झाल्यानंतर पैसे मिळतील, अशी उडवाउडवीची उत्तरे बँक कर्मचारी देत असल्याने खातेदारांनी संताप व्यक्त केला आहे.
ग्राहकांना देण्यात आलेले टोकण.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळवण : मानूर येथील येस बँकेच्या शाखेत खडखडाट झाला असून, तालुक्यातील खातेदारांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. शाखेत रोकड उपलब्ध झाल्यानंतर पैसे मिळतील, अशी उडवाउडवीची उत्तरे बँक कर्मचारी देत असल्याने खातेदारांनी संताप व्यक्त केला आहे.
खेडगाव येथील सेवानिवृत्त सैनिक सुरेश पगारे यांनी निवृत्तीनंतर मिळालेले सर्व पैसे मानूर, ता. कळवण येथील येस बँकेच्या शाखेत ठेवले आहेत. शनिवारी सकाळी शेतमजुरांना कामाचा मोबदला देण्यासाठी ते एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता मशीनमधून पैसे आले नाही. त्यांनी थेट बँक गाठून बँक कर्मचाऱ्यांशी चर्चा केली असता, त्यांना चेक आणला आहे का, अशी विचारणा झाली. त्यांनी घरी धाव घेत धनादेश नेला व बॅँक कर्मचाºयाकडे दिला. धनादेश देऊनही रोकड मिळाली नाही. रोकडऐवजी टोकन देण्यात आले आहे.
शाखेत पैसे नसल्याने ज्यावेळी रोकड येईल त्यावेळी तुम्हाला बोलावू असे बॅँकेकडून सांगण्यात आले. बॅँकेकडे अधिक चौकशी केली असता ठेवीदारांना ५० हजारांपर्यंत रोकड दिली जात असल्याची खोटी माहिती देण्यात आली. बॅँक कर्मचारी खातेदारांना उडवाउडवीची उत्तरे देत असून, खातेदार मेटाकुटीस आले आहेत. सेवा पूर्णपणे खंडितरिझर्व्ह बँकेने येस बॅँकेवर निर्बंध घातल्याने खातेदार आणि ठेवीदारांची पैसे काढण्यासाठी धावाधाव सुरू आहे. बँकेचे नेट बँकिंग, मोबाइल अॅप, डेबिट आणि
क्र ेडिट कार्ड, चेक क्लिअरिंग आदी सेवा पूर्णपणे खंडित करण्यात आल्या आहेत.
हे कमी म्हणून गूगल पे, फोन पे सारखी इतर मोबाइल वॉलेट्समधून येस बँकेच्या खातेदारांना व्यवहार करता येत नसल्याने खातेदारांची पुरती कोंडी झाली आहे.सकाळी पैसे काढण्यासाठी गेलो असता एटीएममधून पैसे आले नाहीत. बँकेत गेल्यानंतर रोकड नसल्याचे सांगत, टोकन देण्यात आले. रोकड आल्यानंतर बोलवण्यात येईल, असे सांगण्यात आले.
- सुरेश पगारे, खातेदार