जिल्हा रुग्णालयात लवकरच रुग्णांसाठी ‘टोकन’ प्रणाली वादाचे प्रसंग टळणार : रुग्णांच्या वेळेचीही होणार बचत
By admin | Published: December 7, 2014 01:44 AM2014-12-07T01:44:34+5:302014-12-07T01:45:06+5:30
जिल्हा रुग्णालयात लवकरच रुग्णांसाठी ‘टोकन’ प्रणाली वादाचे प्रसंग टळणार : रुग्णांच्या वेळेचीही होणार बचत
नाशिक : जिल्हा रुग्णालयात प्राथमिक तपासणी तसेच औषधे घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या, काही बेशिस्त रुग्ण व उर्मट कर्मचारी यांच्यामुळे होणारे वादाचे प्रसंग टाळण्यासाठी जिल्हा रुग्णालयात लवकरच बँकेप्रमाणेच टोकन सिस्टीम प्रणाली सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ एकनाथ माले यांनी दिली़ नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्'ासह विभागातून रुग्ण तपासणीसाठी येतात़ रुग्णांची सकाळी साडेआठ ते बारा व दुपारी चार ते सहा या दोन वेळेत रुग्ण तपासणी केली जात असून, ओपीडी विभाग खुला असतो़ मात्र रुग्णालयात दिवसेंदिवस रुग्णांची वाढती गर्दीमुळे ओपीडी, आपत्कालीन तसेच औषध विभागातील कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो़ यामध्ये काही बेशिस्त रुग्णांबरोबरच कर्मचाऱ्यांच्या उर्मट स्वभावामुळे असे वादाचे प्रसंग घडतात़ रुग्ण, रुग्णालयीन कर्मचारी तसेच रुग्ण तपासणी करणारे डॉक्टर यांच्या सुसंवाद साधला जावा तसेच वादाचे प्रसंग टळावेत यासाठी लवकरच बँकेप्रमाणेच टोकन प्रणाली सुरू करण्यात येणार असल्याची माहिती डॉ़ एकनाथ माले यांनी दिली़ तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांना आल्यानंतर केस पेपर काढावा लागतो़ या केसपेपरच्या ठिकाणीच त्यांना नंबरचे एक टोकन दिले जाईल़ ज्या क्रमांकाचे रुग्ण येतील तसाच टोकन नंबर असेल़ ओपीडी, औषध विभाग व कॅज्युअल्टी या ठिकाणी डिस्प्ले ठेवला जाईल़ तिथे जो नंबर डिस्प्ले केला जाईल त्याप्रमाणे रुग्णांची तपासणी केली जाईल़