मद्य खरेदीसाठी घ्यावे लागणार टोकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 10:25 PM2020-05-07T22:25:51+5:302020-05-07T23:48:24+5:30

नाशिक : लॉकडाउन काळात गेल्या सोमवारी मद्यविक्रीसाठी जिल्हा प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली होती. यावेळी मद्यपींची मद्यखरेदीकरिता एकच झुंबड उडाल्यामुळे ‘डिस्टन्स’ नियमांचे तीनतेरा वाजले आणि लॉकडाउनचा फज्जादेखील उडाल्याचे चित्र शहरात दिसून आले.

 Tokens to buy alcohol | मद्य खरेदीसाठी घ्यावे लागणार टोकन

मद्य खरेदीसाठी घ्यावे लागणार टोकन

Next

नाशिक : लॉकडाउन काळात गेल्या सोमवारी मद्यविक्रीसाठी जिल्हा प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली होती. यावेळी मद्यपींची मद्यखरेदीकरिता एकच झुंबड उडाल्यामुळे ‘डिस्टन्स’ नियमांचे तीनतेरा वाजले आणि लॉकडाउनचा फज्जादेखील उडाल्याचे चित्र शहरात दिसून आले. पोलिसांना गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य स्वरूपात बळाचाही वापर करावा लागला होता. यानंतर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी तत्काळ मद्यविक्री बंदीचे आदेश काढले. यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे मद्यविक्रीबाबतचे व्यवस्थापन सोपविण्यात आले. या विभागाने आता शहरात चाचपणी सुरू केली असून, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी टोकन पद्धतीचा अवलंब केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्यविक्रीची दुकाने सुरू करण्याबाबत ‘ग्रीन सिग्नल’ मिळाल्याची माहिती मिळताच शहरातील मद्यव्रिकीची दुकाने पुन्हा सुरू होणार असल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. यानंतर पुन्हा शेकडोंच्या संख्येने मद्यपींनी आपल्या जवळच्या दुकानांजवळ कूपन अथवा टोकन घेण्यासाठी रणरणत्या उन्हात रांगा लावल्याचे दिसून आले. यामध्ये ग्राहकाला ठराविक चिठ्ठी दिली जाईल. यामध्ये ग्राहकाने स्वत:चे नाव, मोबाइल नंबर, मद्याची मागणी इत्यादी गोष्टी एका कागदावर लिहून दुकानदाराला द्यावयाच्या आहेत. यानुसार दर तासाला ५० ग्राहकांना मद्यविक्री केली जाऊ शकते, असा अंदाज राज्य उत्पादन विभागाकडून वर्तविला गेला आहे. दिवसभरातून एकूण ४०० ग्राहकांना मद्यविक्री केली जाईल. अगोदरच्या दिवशी ज्या ग्राहकांना मद्य मिळू शकले नाही त्यांना दुसºया दिवशी मद्य उपलब्ध करून देण्याची सोय करावी, असेही राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक डॉ. मनोहर अंचुळे यांनी सांगितले.
अंचुळे यांनी एक परिपत्रक जारी केले असून त्यानुसार, ग्राहकांना सदर मागणीपत्राचा नमुना दिल्यानंतर त्यांना टोकन क्रमांक देण्यात यावा. जर टोकन उपलब्ध नसेल तर एका कोºया कागदावर दुकानदाराने स्वत:च्या दुकानाचा शिक्का व दूरध्वनी क्रमांक देऊन त्यावर अनुक्रमांक द्यावा. तो अनुक्रमांक ग्राहकाला दिलेल्या अनुक्रमांकाचाच असावा साधारणपणे अशा ५० ग्राहकांना सेवा एका तासात दिली जाऊ शकते. त्यानंतर पुढील तासात ५१ ते १०० क्रमांक असे ८ तासात जास्तीत जास्त ४०० लोकांना मद्यविक्री सहज करता येऊ शकेल, असे उत्पादन शुल्क विभागाने म्हटले आहे.
-------
निरीक्षक, दुय्यम निरीक्षक ‘झोनल आॅफिसर’
विभागातील निरीक्षक व दुय्यम निरीक्षक यांना परिमंडळ अधिकारी म्हणून विशिष्ट भागासाठी नियुक्त करण्यात आले आहे. तसेच भरारी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात गर्दीच्या एफएल-२ अनुज्ञप्तीच्या ठिकाणी वारंवार भेटी देत पाहणी करून योग्य त्या सूचना करावयाच्या असल्याचे म्हटले आहे. नियमांचा भंग करणाºयांविरुद्ध कायदेशीर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
---
गर्दी कमी होण्यास मदत
दुकानदाराने दर १५ मिनिटांनंतर अथवा आवश्यकतेनुसार कोणत्या ग्राहकाच्या टोकन क्रमांकाची सेवा सुरू आहे ते सूचना फलकारवर नमूद करावे. यातून गर्दी कमी होण्यास मदत होईल. ग्राहकांनी तोंडाला मास्क व परस्परांमध्ये ‘डिस्टन्स’ ठेवणे आवश्यक असून, यासाठी विक्रेत्यांनी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करून शिस्तीत मद्यविक्री करावयाची आहे, असेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title:  Tokens to buy alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक