शेतकºयांसाठी ‘टोल-फ्री’ क्रमांक जिल्हाधिकारी : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रशासनाचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:48 AM2018-01-31T00:48:34+5:302018-01-31T00:49:10+5:30

नांदगाव : शेतकºयांच्या आत्महत्या शून्यावर आणण्यासाठी प्रशासनातर्फे शेतकºयांसाठी लवकरच ‘टोल-फ्री’ क्रमांक योजना सुरू करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिली.

'Toll-free' district collector for farmers: Farmers' initiative to prevent suicides | शेतकºयांसाठी ‘टोल-फ्री’ क्रमांक जिल्हाधिकारी : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रशासनाचा उपक्रम

शेतकºयांसाठी ‘टोल-फ्री’ क्रमांक जिल्हाधिकारी : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रशासनाचा उपक्रम

googlenewsNext
ठळक मुद्देमहाराजस्व अभियानशेतीपूरक जोडउद्योग सुरू करावे

नांदगाव : शेतकºयांच्या आत्महत्या शून्यावर आणण्यासाठी या संकटाचा सामुदायिकपणे सामना करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे शेतकºयांसाठी लवकरच ‘टोल-फ्री’ क्रमांक योजना सुरू करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिली. तालुक्यातील श्रीक्षेत्र नस्तनपूर येथे शनी महाराज देवस्थान व महसूल विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराजस्व अभियान व कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. व्यासपीठावर माजी आमदार संजय पवार, माजी आमदार जगन्नाथ धात्रक, जेष्ठ नेत्या जयश्रीताई दोंड, सभापती सुमनताई निकम यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. शनेश्वर देवस्थानचे प्रमुख विश्वस्थ व माजी आमदार अनिल अहेर यांनी प्रास्ताविकात तालुक्यातील पाणीप्रश्न व जिल्ह्यात सर्वाधिक शेतकºयांच्या झालेल्या आत्महत्या या नांदगाव तालुक्यातील असल्याबद्दलची खंत व्यक्त केली. हाच धागा पकडीत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी नांदगाव तालुक्यातील शेतकºयांच्या वाढत्या आत्महत्या लक्षात घेता शेतकºयांनी संघटित होऊन सामुदायिकपणे शेतीपूरक जोडउद्योग सुरू करावे, असे आवाहन केले. तसेच शेतकºयांनी दुग्ध, पोल्ट्री यासारखे व्यवसाय प्रशिक्षण घेऊन उभे करावे. कमी गुंतवणुकीत अधिक उत्पन्न कसे मिळेल यावर शेतकºयांनी भर द्यावा, असेही ते म्हणाले. कृषी विभागाच्या योजनांचा शेतकºयांनी लाभ घ्यावा, आत्महत्या करणे हा कर्जाला पर्याय नाही, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांच्या हस्ते जातीचे दाखले व शिधापत्रिका वाटप करण्यात आल्या. येवल्याचे उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे, आत्माचे संचालक अशोक कांबळे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
८० हून अधिक माहितीपर दालने
महसूल विभागाच्या वतीने विविध शासकीय दाखल्यांसाठी या प्रदर्शनात स्टॉल मांडण्यात आले होते. त्याला जोडून शेतकºयांच्या प्रबोधनासाठी तालुका कृषी विभागाच्या वतीने कृषी प्रदर्शनाचे ८० हून अधिक माहितीपर दालने लावण्यात आली होती. त्यात कांदा, द्राक्षे, गहू, मका, बाजरी, तांदूळ, हरभरा, कपाशी व कांदा पिकावरील स्टॉलवर जाऊन शेतकरी माहिती घेत होते. शेकडो नागरिकांनीदेखील विविध दाखल्यांसाठी गर्दी केली होती. यावेळी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Web Title: 'Toll-free' district collector for farmers: Farmers' initiative to prevent suicides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी